मुंबई : ऑल इंडीया क्रिकेट असोसिएशन ऑफ डेफ (AICAD) यांच्या मान्यतेने, तेलंगणा स्टेट क्रिकेट असोसिएशन ऑफ द डेफ (TSCAD) यांच्या वतीने तसेच तेलंगणा राज्य सरकार व हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने दि २२ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय २०-२० मुक-बधिरांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत यजमान तेलंगणा संघासह महाराष्ट्र,हरिय़ाणा, दिल्ली,छत्तीसगड,पॉडिचेरी, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश व जम्मू आणि काश्मीर असे एकूण १० संघ सहभागी झाले होते. सदर स्पर्धा प्रथमत: साखळी, उपउपांत्य, उपांत्य व अंतिम स्वरुपाची पार पाडली. त्यामध्ये महाराष्ट्र संघाने सर्व लीग व उपउपांत्य, उपांत्य सामने जिंकून अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र संघाने दिल्ली संघावर ४० धावांने मात करुन विजेतेपद पटकाविले. संपुर्ण स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या हर्षल जाधव, विराज कोलते, रतनदिप धानू, इंद्रजित यादव, प्रणील मोरे इ. मह्त्वाचे योगदान दिले. अंतिम सामन्याचा धावफलक खालीलप्रमाणेमहाराष्ट्र संघ: २० ओव्हरमध्ये ७ बाद १६१ (प्रणील मोरे ३९, विराज कोलते ३४, हर्षल जाधव १८, इंद्रजित यादव १६, सुदीश नायर १६, रुपेश कुमार १६/३, दिपक रावत ३०/१, धिरज २५/१) विजयी विरुध्द दिल्ली : २० ओव्हरमध्ये ९ बाद १२१ (विकी सिंग ३३, नावेद खान २१, लोकेश रोहतगी १५, प्रणील मोरे २१/२,कृष्णा शेळके २५/२, सुमीत सदाफुले २६/२, हर्षल जाधव १७/१,रतनदिप धानू १८/१)
अंतिम सामन्याचा पारितोषिक वितरण समारंभ श्री विवेकानंद , मेंबर ऑफ पार्लमेंट याच्या हस्ते पार पाडला. यामध्ये महाराष्ट्राच्या हर्षल जाधव यांने मॅन ऑफ दि सिरीज (१७९ धावा( ५ मॅच) ६ विकेट), विराज कोलते उत्कृष्ट फलंदाज (१७४ धावा (५ मॅच)) व रतनदिप धानू (११ विकेटस (५ मॅच)) अशी वैयक्तिक विजेतेपदे मिळविली. महाराष्ट्र संघाला विजेतेपदाची ट्रॉफी, र.रु. ५१०००/- रोख म्हणून मिळाली.