भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं मुंडण केलेला भीक्षूच्या अवतारात असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लुकमागे अनेक तर्क लावले गेले. पण, त्यामागचं खरं कारण अखेर समोर आलं आहे. ( Mahendra Sigh Dhoni new look reason reveal). CSKनं इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाची ( IPL 2021) तयारी सुरू केली आहे. त्यासाठी धोनी चेन्नईत दाखल झाला असून त्यानं सहकाऱ्यांसोबत सरावाला सुरुवातही केली. यातच धोनीच्या नव्या लूकनं सर्वांना अचंबित केलं आहे. वडिलांनी माझ्या डोळ्यांनी स्वर्गातून सचिन तेंडुलकरला प्रत्यक्ष खेळताना पाहिलं, Emotional Photo Viral
धोनीनं हा लूक आयपीएल २०२१च्या प्रमोशनसाठी बदलला आहे. आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं जाहीराती तयार केल्या आहेत. यात धोनी जंगलमध्ये मुलांसोबत दिसत आहे आणि भीक्षूच्या रुपात दिसत आहेत. या जाहीरातींमध्ये तो रोहित शर्माला ( Rohit Sharma) ट्रॉफीसाठी लालची म्हणत आहे, तर विराट कोहलीला ( Virat Kohli) रागीट म्हणत आहे.
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.