टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला वगळले, मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली असून अनुभवी आणि दिग्गज महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांना धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 12:58 AM2018-10-27T00:58:22+5:302018-10-27T06:47:56+5:30

whatsapp join usJoin us
Mahendra Singh Dhoni dropped for the T-20 series, India's announcement for the series | टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला वगळले, मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

टी-२० मालिकेसाठी महेंद्रसिंग धोनीला वगळले, मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुणे : वेस्ट इंडिज आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली असून अनुभवी आणि दिग्गज महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळण्यात आल्याने क्रिकेटचाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचप्रमाणे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारताची धुरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली असून नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मात्र संघाचे नेतृत्त्व विराट कोहलीकडे असेल. दोन्ही मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी युव रिषभ पंतकडे असेल. मर्यादित षटकांच्या आणि खास करुन टी२० क्रिकेटसारख्या वेगवान प्रारुपमध्ये धोनीने आपल्या कल्पक नेतृत्त्वाने अनेकदा सामने जिंकवून दिले आहेत. तो फलंदाजीत जरी अपयशी ठरला, तरी त्याची भरपाई यष्टीरक्षण आणि अनेक अडचणींच्या परिस्थितीत घेत असलेल्या निर्णयांद्वारे भरुन काढतो. मात्र आता राष्ट्रीय निवडकर्त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेसाठी धोनीला संघाबाहेर केले आहे.
४ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती मिळाली असून संघाचे नेतृत्त्व रोहितकडे सोपविण्यात आले आहे. यासह तिसºयांदा एखाद्या पूर्ण मालिकेत रोहित भारताचे नेतृत्त्व करेल. याआधी त्याने भारतात २०१७ साली झालेल्या लंकेविरुद्धची टी२० मालिका, त्यानंतर २०१८ मध्ये श्रीलंकेत झालेली निदाहास टी२० मालिका आणि काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत रोहितने भारताचे कर्णधारपद भूषविले होते. कोहली २१ नोव्हेंबरपासून ब्रिस्बेन येथे रंगणाºया आॅस्टेÑलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतून संघात पुनरागमन करेल.
तसेच, आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये मुरली विजयलाही स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला वगळले होते. कसोटी मालिकेसाठी हिटमॅन रोहित शर्मासह पार्थिव पटेलचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे. त्यामुळे अंतिम संघात या दोघांना स्थान मिळाल्यास ही संधी हे दोघे कसे साधतात याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्याचवेळी विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून जबरदस्त पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉ तसेच हनुमा विहारी या युवा खेळाडूंनाही अपेक्षेप्रमाणे संघात स्थान मिळाले आहे.
..............................

विंडीजविरुद्ध टी२० मालिकेचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव आणि शाहनाझ नदीम.

आॅस्ट्रेलियाविरुद्धचा टी२० संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि खलील अहमद.

आॅस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी संघ :
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार.

Web Title: Mahendra Singh Dhoni dropped for the T-20 series, India's announcement for the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.