MS Dhoni Spotted In RR Silver Wraith: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला कार आणि बाईक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे नवीन आलिशान गाड्यांपासून ते जुन्हा व्हिंटेज गाड्यांपर्यंत, वाहनाचा मोठा ताफा आहे. अलीकडेच धोनीचा 1973 पोंटियाक ट्रान्स एएम एसडी-455 गाडी चालवतनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता 1980 ची रोल्स रॉयस सिल्व्हर रैथ चालवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
धोनीचे रांचीमध्ये मोठे फार्म हाऊस आहे आणि तिथेच त्याचे गाड्यांचे कलेक्शन ठेवले आहे. तो अनेकदा आपल्या ताफ्यातील विविध गाड्या चालवताना दिसतो. आता त्याने त्याच्या ताफ्यातील 45 वर्षे जुनी मिडनाईट ब्लू कलरची रोल्स रॉयस सिल्व्हर रैथ रांचीच्या रस्त्यावर चालवली. ही कार धोनीच्या गॅरेजमध्ये अनेकदा दिसली आहे, पण धोनी ही लक्झरी विंटेज सेडान चालवताना कदाचित पहिल्यांदाच दिसला आहे. या मॉडेलचे फक्त मर्यादित युनिट्स जगभरात विकले गेले, त्यापैकी एक सध्या धोनीकडे आहे.
विशेष म्हणजे धोनीकडे अनेक विंटेज कार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच धोनीच्या कलेक्शनमध्ये 40 वर्षांहून अधिक जुनी Pontiac Trans-Am देखील सामील झाली आहे. ही एक मस्क्युलर क्लासिक कार आहे. यात 455 बिग-ब्लॉक V8 इंजिन असून, हे इंजिन सुमारे 325 Bhp कमाल पॉवर जनरेट करते.
धोनीच्या गॅरेजमध्ये 1969 ची फोर्ड मस्टँग, Hummer H2, Nissan 1 Ton ट्रक, Jeep Grand Cherokee TrackHawk यासह अनेक आलिशान कार आणि सुपरकार्स आहेत. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात धोनाचे संपूर्ण गॅरेज बाईक आणि कारने भरलेले दिसत होते.