Join us  

महेंद्रसिंह धोनी भाजपत करणार प्रवेश? गृहमंत्री अमित शाहंसोबत झाली भेट; PHOTO व्हायरल!

सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये महेंद्रसिंह धोनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 8:32 PM

Open in App

आपल्या देशात खेळाडू आणि नेत्यांचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अनेक खेळाडूंनी राजकारणात प्रवेश करून यशही मिळविले आहे. आपल्या आवडत्या खेळाडूने राजकारणात यावे, असे अनेक लोकांना वाटत असते. यातच आता, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली आहे. धोनी आणि शाह यांच्या भेटीनंतर लोक ना-ना प्रकारचे प्रश्न विचारू लागले आहेत. एवढेच नाही, तर अमित शाह आणि धोनी यांचा एक फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांना सोबत बघून, 'धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार का?' असा प्रश्न लोक विचारत आहेत.

सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये महेंद्रसिंह धोनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. हा फोटो इंडिया सिमेंटला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या एका इव्हेंटमधील आहे. या कार्यक्रमात तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवि देखील सहभागी झाले होते. महत्वाचे म्हणजे, एन श्रीनिवास हे इंडिया सिमेंटचे मालक आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा त्यांचा संघही आहे. कार्यक्रमासाठी चेन्नईमध्ये पोहोचलेल्या अमित शाह यांचे भाजपच्या अनेक नेत्यांनी एअरपोर्टवर स्वागतही केले.

अमित शाह आणि एमएस धोनी यांची 2018 मध्येही भेट झाली होती. तेव्हाही एमएस धोनी भारतीय जनता पक्षात प्रेवेश करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत धोनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय हालचालींपासून दूर राहिला आहे. वर्ल्ड कप, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी हा भारताच्या महान कर्णधारांपैकी एक आहे. आगामी आयपीएल 2023 मध्ये तो पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जची धुरा सांभाळताना दिसेल. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीअमित शाहभाजपासोशल मीडियाराजकारण
Open in App