Join us  

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनीचं सैन्यप्रेम हे सर्वांना माहीत आहे..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:02 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जुलै 2019पासूनच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि धोनीच्या निर्णयानं अखेर त्या आता थांबल्या. क्रिकेटनंतर धोनीचं प्रेम म्हणजे भारतीय सैन्य... म्हणूनच वन डे वर्ल्ड कपनंतर क्रिकेटपासून दूर असलेला धोनी 15 दिवसांसाठी जम्मू-काश्मीर खोऱ्यात भारतीय जवानांसोबत पहारा देण्यासाठी पोहोचला. आता निवृत्तीनंतर धोनी भारतीय सैन्याच्या सेवेत दाखल होऊ शकतो, अशी चर्चा रंगत आहे. त्याला दुजोरा देणारा धोनीचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात धोनीनं भारतीय वायूसेनेसह 1250 फुटांवरून झेपावताना दिसत आहे. 

माजी कर्णधार धोनीला भारतीय वायुसेनेत मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आली आहे. वायुसेनेच्या AN32 विमानातून धोनीनं 1250 फुटांवरून उडी घेतली. भारतीय सैन्याच्या पॅरा रेजिमेंट दलाच्या सरावाचा हा भाग होता. धोनीनं यासाठी पॅराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले.  

पाहा व्हिडीओ...

धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रांचीमधील मंदिर अन् धोनी...असं आहे श्रद्धेचं नातं; जाणून घ्या सर्वकाही 

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? 

CPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा 'हॅलिकॉप्टर' शॉट मिस करताय; मग रशीद खानचा 'हा' फटका पाहाच

"Dream 11सोबत सौदा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' मोहिमेला मोठा धक्का!"

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय जवान