धोनीची २०२४ चे आयपीएल खेळण्याची ही तयारी?

या खेळाडूच्या यशाचे गमक काय ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 07:22 AM2023-06-04T07:22:50+5:302023-06-04T07:24:01+5:30

whatsapp join usJoin us
mahendra singh dhoni preparation to play tata ipl 2024 | धोनीची २०२४ चे आयपीएल खेळण्याची ही तयारी?

धोनीची २०२४ चे आयपीएल खेळण्याची ही तयारी?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये सीएसकेने अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजयासह पाचव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जेतेपदामुळे धोनीच्या निवृत्तीबाबतची हवा निघून गेली. गेल्या काही काळापासून ही चर्चा रंगत आहे. यंदा ती अधिक गाजली. गुडघ्याच्या दुखापतनंतरही धोनीने समर्पण वृत्तीच्या बळावर निवृत्तीचा सस्पेन्स अखेरपर्यंत कायम ठेवला.

फायनल आटोपल्यानंतर धोनी काय घोषणा करतो, याची उत्कंठा होती. पण धोनीने चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिले. शरीराने साथ दिल्यास पुढच्या सत्रातही खेळेन, असे सांगून माहीने चाहत्यांचे मन जिंकले. त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली. सध्या तो रांचीमध्ये परतला आहे. पुढच्या सत्रात तो धमाका करण्यास सज्ज होऊ शकतो. या खेळाडूच्या यशाचे गमक काय ...

धोनीची लोकप्रियता अभूतपूर्व अशीच आहे. त्याने भारताला दोन विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. कसोटीत भारत अव्वल स्थानावर असताना २०१० पर्यंत नेतृत्व त्याच्याकडेच होते. याशिवाय आयपीएलची पाच आणि चॅम्पियन्स लीगची दोन जेतेपदे त्यानेच मिळवून दिली.

धोनीला धक्केही बसले. २०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत 'व्हाइटवॉश' झाला. २०१३ ला आयपीएलला स्पॉट- फिक्सिंगचा डाग लागला. सीएसकेचा कर्णधार या नात्याने त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली होती. तरीही कर्णधार म्हणून धोनी यशस्वी का झाला, हा संशोधनाचा विषय ठरावा. तो २००७ पासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करीत आहे. इतका काळ नेतृत्व करणाऱ्या अन्य खेळाडूचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे दिसत नाही. 

कर्णधारपदामुळे खेळाडू दडपणात येतात. पण इतक्या दीर्घ कालावधीत धोनीने प्रत्येक फॉर्मेटमध्ये मिळविलेले यश अतुलनीय असे आहे. मैदानावर तो शांत असतो. यश असो वा अपयश, तो संयमाने वागतो. त्याचा हा दुर्मीळ गुण म्हणावा लागेल. स्वतःची दादागिरी न चालविता इतरांचे तो शांतपणे ऐकतो. सर्वात शेवटच्या खेळाडूचेदेखील ऐकतो. जलद निर्णय घेतो. क्रिकेटची चांगली जाण आहे. या सर्व गुणांमुळे सहकारी, सहायक स्टाफ, मालक आणि अगदी प्रतिस्पर्धीही त्याचा आदर करतात.

धोनी जेव्हा खेळत नसतो तेव्हा स्वतःला क्रिकेटपासून दूर ठेवतो, कुटुंब आणि मित्रांसह, त्याच्या कुत्र्यांसह आणि बाइकसह वेळ घालवतो. इतर सेलिब्रिटीसारखा 'मीडिया क्रेझी' नाही. तो तपस्वी किंवा एकांतात राहणारा नसेल तरी वेगळा आहे, धोनी टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा आदर्श ठरतो, या प्रकारात अनेक यशस्वी कर्णधार असले तरी तो सर्वात निराळा ठरतो.

आता रोहितची परीक्षा

पुढील आठवड्यात आणखी एका यशस्वी कर्णधारावर लक्ष केंद्रित होईल. रोहित शर्मा ओव्हलवर WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ' द नेतृत्व करेल. तो धावा काढण्यात आणि मैदानावरील रणनीतीत किती यशस्वी ठरतो, यावर भारताचे यश अवलंबून असणार आहे. उत्कृष्ट कौशल्यामुळे तो गेल्या काही वर्षात सर्वात यशस्वी फलंदाज बनला आहे. मात्र यंदा आयपीएलमध्ये 'फ्लॉप' झाल्याने मुंबई इंडियन्सलादेखील अपयश पचवावे लागले. धोनी कर्णधार असताना २०१३ पासून भारताने आयसीसी जेतेपद पटकविलेले नाही. २०२१ च्या डब्ल्यूटीसी फायनलचा भारत प्रबळ दावेदार होता, पण न्यूझीलंडकडून निराशादायी पराभव झाला. आता ७ तारखेपासून सुरु होणारी ७ फायनल जिंकल्यास रोहित कर्णधार म्हणून चिरकाल स्मरणात राहील.


 

Web Title: mahendra singh dhoni preparation to play tata ipl 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.