नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते महेंद्रसिंग धोनी भारतीय वन-डे संघाचा महत्त्वाचा भाग असून त्याच्या तुलनेत १० वर्षांनी ज्युनिअर असलेल्या खेळाडूंपेक्षा अधिक फिट व चपळ आहे. धोनीमधील उणिवा शोधण्यापेक्षा टीकाकारांनी त्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण करायला हवे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धोनीवर फलंदाज म्हणून टीका होत आहे, पण त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करीत टीकाकारांना गप्प केले आहे.
शास्त्री म्हणाले,‘आम्ही मूर्ख नाहीत. गेल्या ३०-४० वर्षांपासून हा खेळ बघत आहोत. विराटही एका दशकापासून संघाचा भाग आहे. या वयातही धोनी २६ वर्षांच्या खेळाडूंच्या तुलनेत सरस आहे, याची आम्हाला कल्पना आहे. जे टीका करीत आहेत ते विसरले आहे की, त्यांनीही क्रिकेट खेळले आहे.’
यष्टिपाठी धोनीच्या चपळतेला उत्तर नाही आणि निवड समिती प्रमुख प्रसाद यांनी युवा खेळाडू कुणीच त्याच्या तोडीचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. शास्त्री यांनीही त्यांचे समर्थन केले आहे.
शास्त्री म्हणाले,‘टीकाकारांनी स्वत:ला आरशात बघून प्रश्न विचारायला हवा की, आपण ३६ व्या वर्षी कसे होतो. ते दोन धावा वेगाने पळू शकत होते. जोपर्यंत ते दोन धावा घेतील तोपर्यंत धोनी तीन धावा पळतो. त्याने दोन विश्वकप जिंकले असून त्याची ५१ ची सरासरी आहे. सध्यातरी वन-डेमध्ये त्याचे स्थान घेण्यालायक कुणी यष्टिरक्षक नाही.’
शास्त्रीच्या मते धोनीचा पर्याय शोधणे सोपे नाही. शास्त्री म्हणाले,‘धोनी केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक आहे. त्याच्याकडे असलेले गुण बाजारात मिळत नाही. ते गुण तुम्हाला दुसरीकडे कुठे दिसणार नाहीत. तो कसोटी क्रिकेट खेळत नाही याचा अर्थ तो २०१९ चा विश्वकप खेळू शकतो.’आगामी दक्षिण आफ्रिका दौºयाबाबत बोलताना शास्त्री म्हणाले,‘आमच्यासाठी सर्वच प्रतिस्पर्धी संघ समान आहेत. सर्व प्रतिस्पर्ध्यांचा आदर करायला पाहिजे आणि प्रत्येक लढत स्थानिक सामन्याप्रमाणे आहे. दक्षिण आफ्रिका दौºयावरही हाच प्रयत्न राहील. या संघाकडे काही विशेष करण्याची संधी आहे. आम्ही तेथे विजय मिळवण्याच्या निर्धारासह जाणार आहोत.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Mahendra Singh Dhoni should be seen in the 36th anniversary as well as the glossy faces of the former skipper.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.