Join us  

मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात महेंद्रसिंह धोनीवर पार पडली सर्जरी; जाणून घ्या अपडेट

धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर कसेतरी तो उभा राहिला. काहीवेळ आराम केल्यानंतर तो पुन्हा विकेट किपिंगसाठी आला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 11:11 AM

Open in App

मुंबई - अलीकडेच आयपीएलचा हंगाम संपला असून यंदा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. CSK च्या विजयानं धोनीच्या चाहत्यांमध्ये आनंद आहे. गेल्या २ दिवसांपासून CSK चे सेलिब्रेशन सुरू आहे. परंतु आयपीएलवेळी जखमी झालेल्या महेंद्र सिंह धोनीची गुरुवारी सर्जरी करण्यात आली आहे. 

धोनीच्या गुडघ्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात ऑपरेशन झाले. आयपीएल टूर्नामेंटच्या पहिल्याच मॅचवेळी धोनीला दुखापत झाली होती. गुजरातविरोधात IPL मॅच खेळताना धोनी जखमी झाला. या मॅचच्या १९ व्या षटकांत दीपक चाहरने टाकलेला चेंडू अडवण्यासाठी धोनीने डाइव टाकली. त्यानंतर धोनीला ही दुखापत झाली. धोनीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर कसेतरी तो उभा राहिला. काहीवेळ आराम केल्यानंतर तो पुन्हा विकेट किपिंगसाठी आला. 

मॅचनंतर CSK चे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, टूर्नामेंटच्या पहिल्या मॅचमध्ये धोनीच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो इतर सामन्यावेळी गुडघ्याला पट्टी बांधून खेळत होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे धोनीला संपूर्ण इनिंगमध्ये फलंदाजी करणे शक्य झाले नााही त्यामुळे यंदा त्याची कामगिरी खालावली. पिचवर तो धावून रन्स घेण्याऐवजी मोठे शॉट्स मारताना दिसला. 

रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि पंत यांच्याही गुडघ्यावर शस्त्रक्रियाधोनीपूर्वी सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांच्याही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सुरेश रैनाची वयाच्या ३२ व्या वर्षी २०१९ मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. रैनाला २००७ पासून गुडघ्याचा त्रास होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया झाली होती. आशिया चषकादरम्यान हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी-२० वर्ल्ड कपसह अनेक स्पर्धांमधून संघाबाहेर होता. त्याचवेळी कार अपघातानंतर पंत याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यांच्या गुडघ्यावरही कोकिलाबेन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी दिल्लीहून रुरकी येथील घरी जात असताना पंतला अपघात झाला होता.  

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनी
Open in App