मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) बुधवारी संघाची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी संघात पुनरागमन करणार आहे. रिषभ पंतला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे, तर उमेश यादवलाही ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यात धोनी अखेरचा खेळला होता. मात्र, त्याची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्याला 2018 मध्ये 13 डावांत 25च्या सरासरीनेच धावा करता आल्या आहेत. पदार्पणानंतरची त्याची ही सर्वा निच्चांक कामगिरी आहे. मागील सात आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अनुक्रमे 23, 7, 20, 36, 8, 33 व 0 धावा केल्या. धोनीसह हार्दिक पांड्या व केदार जाधव दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणार आहेत.
असा असेल संघ
वन डे संघः विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, मोहम्मद शमी
ट्वेंटी-20 संघः विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद.
वन डे मालिकेचे वेळापत्रक
ऑस्ट्रेलियाः 12 जानेवारी ( सिडनी), 15 जानेवारी ( अॅडलेड) आणि 18 जानेवारी (मेलबर्न)
न्यूझीलंडः 23 जानेवारी, 26 जानेवारी, 28 जानेवारी, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी
न्यूझीलंड ( ट्वेंटी-20 मालिका) : 6 , 8 व 10 फेब्रुवारी.
Web Title: Mahendra Singh Dhoni's comeback in the Indian squad, the BCCI's announcement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.