भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या विरोधात त्याच्याच एका मित्राने न्यायालयाच धाव घेतली आहे. दोन व्यवसायिक भागिदारांनी धोनीविरोधात दिल्ली न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. १८ जानेवारीला न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे.
मिहिर दिवाकर म्हणाला, त्याने धोनीसोबत कोणतीही फसवणूक केलेली नाही, तरीही सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. धोनीने त्याच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत, त्यामुळे त्याचा खूप अपमान झाला आहे. याच कारणावरून मिहिर दिवाकर आणि त्याच्या पत्नीने धोनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मिहिर दिवाकरने जगभरात क्रिकेट अकॅडमी सुरु करण्यासाठी २०१७मध्ये एमएस धोनीबरोबर करार केला. यासाठी त्यांनी अर्का स्पोर्ट्स नावाच्या कंपनीची स्थापना केली. पण या करारतील अटींचं मिहिर दिवाकरने पालन केलं नाही. करारानुसार अर्का स्पोर्ट्स फ्रेंचाईजीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात समान विभागनी केली जाणार होती. पण मिहिरने कोणत्याही नियम आणि अटींची पूर्तता केली नसल्याचं सांगण्यात येत आहे.
माहिर हा धोनीचा जवळचा मित्र-
धोनीने अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट लिमिटेडचे मिहिर दिवाकर आणि सौम्या यांच्याविरुद्ध रांची कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता. माहिर दिवाकर हा धोनीचा जवळचा मित्र आहे आणि त्याचा बिझनेस पार्टनरही आहे.
धोनीनेही पाठवली नोटीस-
धोनीने देखील १५ ऑगस्ट २०२१ रोजी अर्का ऑथोरिटी प्राधिकरण पत्र मागे घेतले. धोनीने त्याला अनेक कायदेशीर नोटीस पाठवल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यानंतर धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला आहे की अर्का स्पोर्ट्सने त्याची फसवणूक केली आहे, ज्यामुळे धोनीचे १५ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.