इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) इतकी वाईट अवस्था कदाचितच कुणी पाहिली असेल. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात किमान प्ले ऑफ पर्यंत मजल मारणाऱ्या एकमेव CSKसंघाला IPL 2020त अंतिम चारमध्ये प्रवेश करताना संघर्ष करावा लागत आहे. Indian Premier Leagueमध्ये Play Offचं आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात CSKकडून संघर्ष पाहायला मिळेल, अशी किमान अपेक्षा चाहत्यांना होती. पण, त्यांचा अपेक्षाभंग झाला. आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन यशाची शिखरं पादाक्रांत करणाऱ्या CSKला यंदा मात्र अपयश आले. करो वा मरो लढतीत राजस्थान रॉयल्सच्या संघानं त्यांना ५ बाद १२५ धावांवर रोखले. या सामन्यात MS Dhoni धावबाद झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे धोनीची आयपीएल कारकीर्दही Run Outच संपवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
महेंद्रसिंग धोनीनं १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. 10 जुलै 2019ला धोनीने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंडमधील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. न्यूझीलंडविरुद्ध धोनी भारताला हा सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण धोनी चोरटी धाव घ्यायला गेला आणि रनआऊट झाला होता. धोनी आपल्या अखेरच्याच सामन्यात रन आऊट झाला. त्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेरीस त्यानं १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली.
आज IPL मधील सामन्यातही राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांसमोर चेन्नईच्या फलंदाजांना अपयश आले. सॅम कुरन ( २२), फॅफ ड्यू प्लेसिस ( १०), शेन वॉटसन ( ८), अंबाती रायुडू ( १३), महेंद्रसिंग धोनी ( २८) आणि रवींद्र जडेजा ( ३५*) हे सर्व धुरंधर अपयशी ठरले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला. जोफ्रा आर्चरनं केलेल्या थ्रो वर संजू सॅमसननं धोनीला धावबाद केले. त्यात आजचा सामना पराभूत झाल्यास चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होईल आणि हा धोनीच्या IPL कारकीर्दीला उतरती कळा देणारा प्रसंग ठरेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महेंद्रसिंग धोनीची आयपीएलमधील कामगिरीसामने - २००धावा - ४५९६सर्वोत्तम धाव - ८४*सरासरी - ४१.५२स्ट्राईक रेट - १३७.६७अर्धशतकं - २३चौकार - ३०६षटकार - २१५