Join us  

महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ? राहुल द्रविडची सुट्टी होणार

दुसरीकडे, बीसीसीआय सचिव जय शाह हे प्रशिक्षकपदी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्याच्या विचारात आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 6:56 AM

Open in App

नवी दिल्ली : दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यकाळात दोनवेळा भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकण्याची संधी हुकली. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये बदल होऊ शकतो. चाहत्यांच्या मते, राहुल द्रविड यांना प्रशिक्षकपदावरून लवकरात लवकर हटविले पाहिजे. दुसरीकडे, बीसीसीआय सचिव जय शाह हे प्रशिक्षकपदी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्याच्या विचारात आहेत.

द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला आशिया कप २०२२, टी-२० विश्वचषक २०२२ आणि डब्ल्यूटीसी फायनल २०२३ यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश आले. त्यामुळे  द्रविड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल, असे वाटले होते. मात्र, असे काहीही झालेले नाही. त्यामुळे जय शाह लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या वर्षी भारतीय संघ मायदेशात वनडे विश्वचषक खेळणार आहे.आपल्या यजमानपदाखाली भारतीय संघाला विजेतेपद मिळविण्यात अपयश आले तर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची सुट्टी होऊ शकते.

धोनी मुख्य प्रशिक्षक?महेंद्रसिंग धोनी भारताचा कर्णधार होता त्यावेळी संघ दमदार कामगिरी करीत होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी खालावत गेली आहे.  बीसीसीआय धोनीलाच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. धोनी हा २०२१ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटॉर होता. आता हेड कोच म्हणून जोडला जाऊ शकतो.

सेहवाग, हेसन शर्यतीतमहेंद्रसिंग धोनीशिवाय वीरेंद्र सेहवाग आणि न्यूझीलंडचे माजी कोच माइक हेसन हेदेखील टीम इंडियाच्या कोचपदाच्या दावेदारीत आहेत. सेहवागने याआधीही कोचपदासाठी अर्ज केला होता. मात्र, रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांची नावे पुढे आली होती. हेसन कोच असताना न्यूझीलंडने २०१५ च्या वन डे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. हेसन हे आयपीएलमध्ये आरसीबीचे क्रिकेट संचालक आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी
Open in App