माही भाईनं पॅटर्न सेट केला आहे; रवींद्र जडेजानं सांगितला MS Dhoniचा सल्ला कसा कामी आला!

India vs Australia : हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 3, 2020 10:21 AM2020-12-03T10:21:42+5:302020-12-03T10:22:53+5:30

whatsapp join usJoin us
Mahi Bhai has a set pattern: Ravindra Jadeja recalls Dhoni's advice after batting blitzkrieg against Australia | माही भाईनं पॅटर्न सेट केला आहे; रवींद्र जडेजानं सांगितला MS Dhoniचा सल्ला कसा कामी आला!

माही भाईनं पॅटर्न सेट केला आहे; रवींद्र जडेजानं सांगितला MS Dhoniचा सल्ला कसा कामी आला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia : भारतीय संघाला अखेर विजयी सूर गवसला... तिसऱ्या व अखेरच्या वन डे सामन्यात टीम इंडियानं यजमान ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय मिळवला. ५ बाद १५२ धावा अशा अवस्थेत हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी विक्रमी १५० धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला ५ बाद ३०२ धावांचा डोंगर उभा करून दिला. त्यानंतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावताना ऑस्ट्रेलियाचा डाव २८९ धावांत गुंडाळला. जडेजानं तिसऱ्या सामन्यातील दमदार कामगिरीचे श्रेय महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) सेट केलेल्या पॅटर्नला दिले.  

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर जडेजानं धोनीनं सेट केलेल्या पॅटर्नवर मत व्यक्त केले.   टीम इंडिया शॉर्ट फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर देणार?; जाणून घ्या ट्वेंटी-20 मालिकेचे वेळापत्रक

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा फंडा वापरलास का? असा प्रश्न विचारला. त्यावर जडेजा म्हणाला,''हो नक्कीच... माही भाई प्रदीर्घकाळ टीम इंडियासाठी आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे आणि त्यानं एक पॅटर्न सेट केला आहे. तो कोणत्याही खेळाडूसोबत प्रथम भागीदारी सेट करतो आणि खेळपट्टीवर तग धरल्यानंतर तो फटकेबाजी करायचा. तो नेहमी सल्ला द्यायचा की भागीदारी सेट झाल्यावर सामन्याच्या अखेरच्या षटकांत जबरदस्त फटकेबाजी कर. त्याला असं करताना मी अनेकदा पाहिले होते आणि त्याच्यासोबत मी अनेकदा खेळलो आहे. तो नेहमी सांगायचा, आपण सामना अखेरच्या षटकापर्यंत खेचला तर अखेरच्या चार-पाच षटकांत धावा येणारच.'' चूक महागात पडली, टीम इंडियाला पेनल्टी; ICC Cricket World Cup Super Leagueमध्ये बसला मोठा फटका

 

Web Title: Mahi Bhai has a set pattern: Ravindra Jadeja recalls Dhoni's advice after batting blitzkrieg against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.