Join us  

Team India Selection Committee: टीम इंडियाच्या निवड समितीत मोठा बदल; बांगलादेश कसोटी मालिकेआधी BCCIचा निर्णय

BCCI, Team India Selection Committee: सिलेक्शन कमिटीमध्ये भारतीय संघाच्या माजी विकेटकिपरला मिळाली संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 11:57 AM

Open in App

BCCI, Team India Selection Committee: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ संघाने श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका जिंकली. पण वनडे मालिकेत मात्र संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारताची आगामी कसोटी मालिका बांगलादेश विरूद्ध १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बांगलादेशने नुकताच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभूत केले. त्यामुळे त्यांचा संघ भारतात येण्याआधी BCCI च्या निवड समितीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी माजी भारतीय यष्टीरक्षक अजय रात्रा यांची पुरुष क्रिकेट संघाचा निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. पाच सदस्यीय निवड समितीमध्ये सलील अंकोला यांची जागा त्यांनी घेतली. परंपरेनुसार, पाचही निवडकर्ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधित्व करतात. त्यानुसार रात्रा हे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. अजित आगरकरची गेल्या वर्षी मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती झाल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम विभागातील दोन सिलेक्टर्स होते. अंकोला आधीच समितीचा भाग होते. बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले की, बीसीसीआय क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी अजय रात्रा यांची अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील पुरुष निवड समितीचे नवीन सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. रात्रा हे सलील अंकोला यांच्या जागी समितीत असतील.

अजय रात्रा यांची क्रिकेट कारकीर्द

अजय रात्राने कसोटीच्या १० डावांत १८.११ च्या सरासरीने आणि ३० च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या. ODI च्या ८ डावांत त्याने १२ च्या सरासरीने आणि ७०च्या स्ट्राईक रेटने ९० धावा केल्या. रात्रा हे आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेश रणजी संघांचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेदरम्यान तो भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग होता.

 

टॅग्स :अजित आगरकरबीसीसीआयरोहित शर्माभारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ