लोकांना सांगा तरी, सर्फराज खानबद्दल काय आवडत नाही ते; माजी सलामीवीर BCCI वर भडकला

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी आणि वन डे संघ BCCI कडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:11 PM2023-06-24T13:11:37+5:302023-06-24T13:12:08+5:30

whatsapp join usJoin us
Make it public!former India opener Aakash Chopra criticised the board for lack of clarity over the Sarfaraz Khan's absence | लोकांना सांगा तरी, सर्फराज खानबद्दल काय आवडत नाही ते; माजी सलामीवीर BCCI वर भडकला

लोकांना सांगा तरी, सर्फराज खानबद्दल काय आवडत नाही ते; माजी सलामीवीर BCCI वर भडकला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कसोटी आणि वन डे संघ BCCI कडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा उप कर्णधारपद दिले गेले, तर चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले. या व्यतिरिक्त, यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंनाही कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे, परंतु पुन्हा एकदा सर्फराज खानला ( Sarfaraz Khan) वगळण्यात आले.  


मुंबईकडून खेळणारा सर्फराज खान २०२० पासून सातत्याने चांगला खेळत आहे. गेल्या मोसमात त्याने ६ सामन्यांत तीन शतकं झळकावताना ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या होत्या. २०२१-२२ हंगामात ६ सामन्यांत १२२.७५  च्या सरासरीने ९८२ धावा आणि २०१९-२० हंगामात ६ सामन्यांत १५४.६६च्या सरासरीने ९२८ धावा त्याने केल्या. तीन हंगामात त्याने १० शतकांसह २४६६ धावा केल्या आहेत. तरीही त्याला विंडीज दौऱ्यावर कसोटी संघात न निवडल्याने भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याने बीसीसीआयवर टीका केली आहे. 

Image
चोप्राने BCCIला सर्फराजच्या सततच्या नापसंतीमागील कारण विचारले आहे. तो म्हणाला की, जर त्याची निवड न होण्याचं कारणं त्याच्या देशांतर्गत खेळाशी संबंधित नसतील तर बोर्डाने ती सार्वजनिक करावीत. सर्फराजने अजून काय करावे? जर तुम्ही गेल्या ३ वर्षातील त्याची कामगिरी पाहिली तर तो इतरांपेक्षा वरचढ ठरतोय. त्याने सर्वत्र धावा केल्या आहेत. तरीही, तो निवडला जात नसेल तर तो काय संदेश जातो?" असे चोप्राने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून विचारले.

Image
"हा एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. जर तुम्हाला आणि मला माहित नसलेले काही कारण असेल तर ते सार्वजनिक करा. फक्त सांगा की तुम्हाला सर्फराजबद्दलची ती खास गोष्ट आवडली नाही आणि म्हणूनच तुम्ही त्याची निवड करत नाही. पण,  असे काही आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. सर्फराजला याबद्दल कोणी सांगितले की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही प्रथम श्रेणीतील धावांना महत्त्व देत नसाल तर...''अशी टीका चोप्राने केली.  

Web Title: Make it public!former India opener Aakash Chopra criticised the board for lack of clarity over the Sarfaraz Khan's absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.