मखाया एंटिनीच्या मुलाची भेदक गोलंदाजी, आफ्रिकेला मिळवून दिला विजय

दक्षिण आफ्रिकेच्या मखाया एंटिनीने आपल्या भेदक गोलंदाजीने एक काळ गाजवला होता. मखायाच्या त्याच पाऊल खुणांवर चालताना मुलगा थंडो यानेही दमदार कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 01:16 PM2018-07-24T13:16:23+5:302018-07-24T13:17:12+5:30

whatsapp join usJoin us
Makhaya Ntini's son fire on debut, Africa win | मखाया एंटिनीच्या मुलाची भेदक गोलंदाजी, आफ्रिकेला मिळवून दिला विजय

मखाया एंटिनीच्या मुलाची भेदक गोलंदाजी, आफ्रिकेला मिळवून दिला विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - दक्षिण आफ्रिकेच्या मखाया एंटिनीने आपल्या भेदक गोलंदाजीने एक काळ गाजवला होता. मखायाच्या त्याच पाऊल खुणांवर चालताना मुलगा थंडो यानेही दमदार कामगिरी केली आहे. थंडोच्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाने पहिल्या वन डे सामन्यात यजमान इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाला 79 धावांनी पराभूत केले. 



या लढतीत थंडोने 8 षटकांत 19 धावा देताना 4 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे थंडो प्रथमच राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व  करत आहे. आफ्रिकेच्या विजयात चमकणा-या थंडोवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत थंडो म्हणाला की, हा सामना पाहताना वडीलांना माझा अभिमान नक्की वाटला असेल. 
मखायाने 1998 मध्ये श्रीलंकेविरूद्ध राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केले होते आणि त्याने 2011 मध्ये भारताविरूद्ध अखेरचा टी -20 सामना खेळला होता. कसोटी कारकिर्दीत 101 सामन्यांत 390 विकेट घेतले, तर 173 वन डेमध्ये त्याच्या नावावर 266 विकेट आहेत.  

Web Title: Makhaya Ntini's son fire on debut, Africa win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.