Join us  

OMG : ओपनरची एक धाव अन् 9 फलंदाज शून्यावर माघारी; 7 चेंडूंत लागला निकाल

नेपाळच्या अंजली चांदनं शनिवारी पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करताना दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिला क्रिकेट सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 5:39 PM

Open in App

नेपाळच्या अंजली चांदनं शनिवारी पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी करताना दक्षिण आशियाई स्पर्धेतील महिला क्रिकेट सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. शनिवारी त्यांनी मालदिव संघाचा संपूर्ण संघ 11.3 षटकांत माघारी पाठवला आणि अवघ्या 7 चेंडूंत नेपाळने हा सामना जिंकलाही. मालदिवच्या सलामीवीरानं एक धाव केली आणि अन्य नऊ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. 

मालदिवला प्रथम फलंदाजी करताना केवळ 8 धावा करता आल्या. मालदिवची सलामीवीर ऐमा ऐशाथनं एक धाव केली. तिच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला भोपळा फोडता आला नाही. अंजलीनं 4 षटकांत 1 धाव देत 4 विकेट्स घेतल्या. तिला सिता राणा मगर ( 2/0) आणि रुबीना छेत्री ( 2/0) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सुमन खाटीवाडा आणि करुणा भंडारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. नेपाळनं 9 धावांचे लक्ष्य 7 चेंडूंत पार केले. काजल श्रेष्ठा ( 2) आणि रोमा थापा ( 5) यांनी हा विजय मिळवून दिला.

टॅग्स :नेपाळमालदीव