Join us  

महिलांपेक्षा पुरुष क्रिकेटपटूंना  मिळते १४ पट अधिक रक्कम! वाचा, कोणाला किती मिळतात पैसै?

मागच्यावर्षी २२ महिलांना तर यंदा १९ महिलांना करारबद्ध करण्यात आले. याउलट पुरुष खेळाडूंची संख्या २७ वरुन २८ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 7:34 AM

Open in App

नागपूर : बीसीसीआयची वागणूक पुरुषधार्जिणी आहे काय? पुरुष आणि महिला खेळाडूंना वार्षिक करारापोटी मिळणाऱ्या रकमेतील प्रचंड तफावत पाहून तरी किमान असेच वाटते. बोर्डाने नुकताच १९ महिला खेळाडूंना करार बहाल केला. त्यातून पुरुष खेळाडूंना महिलांच्या तुलनेत १४ पट अधिक रक्कम मिळते हे स्पष्ट झाले.

मागच्यावर्षी २२ महिलांना तर यंदा १९ महिलांना करारबद्ध करण्यात आले. याउलट पुरुष खेळाडूंची संख्या २७ वरुन २८ करण्यात आली आहे. क श्रेणीतील पुरुष खेळाडूला मिळणारी रक्कम ही अ श्रेणीतील महिला खेळाडूपेक्षा कैकपटींनी अधिक आहे.

महिला खेळाडूंची रक्कमअ श्रेणी ५० लाख - हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि पूनम यादवब श्रेणी ३० लाख - मिताली राज, झूलन गोस्वामी, दीप्ति वर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज.क श्रेणी १० लाख - मानसी जोशी, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पूनिया आणि रिचा घोष.

पुरुष खेळाडूंची रक्कमअ प्लस श्रेणी ७ कोटी  - विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.अ श्रेणी ५ कोटी - रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, लोकेश राहुल, मो. शमी, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या.ब श्रेणी ३ कोटी - रिद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल,क श्रेणी १ कोटी - कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर,वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज.

५ वर्षांत पुरुषांना सात तर महिलांना तीनपट वाढ!ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अन्य देशातील महिला क्रिकेटपटूंना देखील पुरुष खेळाडूंच्या तुलनेत कमी रक्कम मिळते. २०१५-१६ ला पहिल्यांदा भारतीय महिलांना करारबद्ध करण्यात आले. त्यावेळी अ श्रेणीतील खेळाडूंना १५ लाख देण्यात आले. अ श्रेणीतील पुरुषांना तेव्हा एक कोटी रुपये मिळायचे. पुढच्या पाच वर्षांत पुरुष खेळाडूंची रक्कम सातपटींनी वाढली. महिलांच्या रकमेत मात्र तीनपट वाढ करण्यात आली.

बीसीसीआय,आयसीसीने एफटीपी तयार करावेमहिला खेळाडूंना पुरुषांच्या बरोबरीने पैसा मिळण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीने संयुक्त प्रयत्न करावे. त्यासाठी विश्वचषकापर्यंतचे भविष्यातील वेळापत्रक (एफटीपी) तयार केल्यास महिला खेळाडूंची लोकप्रियता वाढू शकेल. त्यातून पैसा येताच महिला क्रिकेटपटू देखील आर्थिकदृष्ट्या भक्कम होऊ शकतील. - साबा करीम,माजी महासंचालक बीसीसीआय

अधिक सामने खेळण्याची संधी मिळायला हवी‘सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लढतींची संख्या वाढायला हवी. सामने जास्त झाले तर महिला खेळाडूंना प्रकाशझोतात राहण्याची संधी मिळेल आणि आर्थिक लाभही होईल.’ -मोना मेश्राम (भारतीय महिला क्रिकेटपटू)