मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी यजमान इंग्लंड संघाने अफगाणिस्तानविरुद्ध 397 धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार इऑन मॉर्गनने तब्बल 148 धावा फटकावल्या आणि त्यात तब्बल 17 षटकारांचा समावेश होता. क्रिकेटमध्ये धावांचे नवनवीन शिखर सर होत असताना दुसरीकडे संपूर्ण संघ 6 धावांवर माघारी जाण्याचा प्रसंग घडला आहे. रवांडा आणि माली यांच्यात खेळवण्यात आलेल्या महिलांच्या ट्वेंटी-20 सामन्यातील हा प्रसंग. क्विबुका महिला ट्वेंटी-20 स्पर्धेत मालीचा संपूर्ण संघ 6 धावांवर तंबूत परतला आणि रवांडा संघाने अवघ्या चार चेंडूंत हे लक्ष्य पार केले.
माली संघाच्या सलामीवीर मॅरियम सॅमेकच्या बॅटीतून एकच धाव आली, उर्वरित नऊ फलंदाज शून्यावर बाद झाले. विशेष नऊ षटकं खेळून काढूनही माली संघाला केवळ 6 धावाच करता आल्या. त्यातील पाच धावा अतिरिक्त होत्या. कोणत्याही ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सर्वात निचांक धावसंख्या ठरली. जोसीन निरांकुडीनेझाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आणि दोन निर्धाव षटकं टाकून... तिला एम बिमेनयीमाना व एम व्हुमिलिया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.