कोलंबो : कर्णधारपदावरुन हटविण्यात आलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या १५ खेळाडूंच्या स्थान देण्यात आले आहे. मलिंगाच्या स्थानी कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याने २०१५ च्या विश्वकप स्पर्धेपासून एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही, हे विशेष.श्रीलंका क्रिकेटचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी संघाची घोषणा करताना सांगितले की,‘तो देशासाठी खेळेल, अशी आम्हाला आशा आहे.’ कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्यानंतर मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल, अशी चर्चा होती.निवड समितीचे प्रमुख असांथा डिमेल म्हणाले,‘मी दूरध्वनीवर त्याच्यासोबत चर्चा केली आणि त्याने कारणही सांगितले.’ श्रीलंकेला विश्वकप स्पर्धेत पहिली लढत १ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायची आहे. श्रीलंकेच्या विश्वकप संघात करुणारत्ने व्यतिरिक्त जीवन मेंडिस, मिलिंदा रिसिवर्धने, जेफ्री वेंडरसे यांचेही पुनरागमन झाले आहे.श्रीलंका संघदिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, तिसारा परेरा, कुसाल जनिथ परेरा, धनंजय डिसिल्वा, कुसाल मेंडिस, इसुरू उदाना, मिलिंदा सिरिवर्धने, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरू तिरिमाने, जेफ्री वेंडरसे, नुवान प्रदीप आणि सुरंगा लकमल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश
श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश
कर्णधारपदावरुन हटविण्यात आलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या १५ खेळाडूंच्या स्थान देण्यात आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:21 AM