Join us  

Malinga Retires: लसिथ मलिंगानं सांगितलं निवृत्ती मागचं कारण

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने वन डे कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:55 PM

Open in App

ढाकाः श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाने वन डे कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.  श्रीलंकेने बांगलादेशवर 91 धावांनी विजय मिळवून मलिंगाला विजयी निरोप दिला. या सामन्यात मलिंगाने 38 धावांत 3 विकेट्स घेत भारताचे दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा वन डेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला. लंगेच्या 314 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 41.4 षटकांत 223 धावांत तंबूत परतला.

मलिंगाने पहिल्या स्पेलमध्ये तमिम इक्बाल (0) आणि सौम्या सरकार ( 15) यांना बाद केले, तर अखेरच्या चेंडूवर मुस्ताफिजून रहमानला ( 18)  माघारी पाठवले. जुलै 2004मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मलिंगाने 226 सामन्यांत 338 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून वन डेत सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज आहे. मुथय्या मुरलीधरन ( 523) आणि चामिंडा वास ( 399) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सामन्यानंतर मलिंगा म्हणाला,''संपूर्ण कारकिर्दीत मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. युवा गोलंदाजही अशीच कामगिरी करतील, अशी आशा आहे. भविष्यात मला हेच अपेक्षित आहे. या युवा गोलंदाजांकडून मॅच विनिंग कामगिरी मला पाहायची आहे. देशासाठी 15 वर्ष खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.  2023च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीनं संघबांधणीला आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. युवा खेळाडूंना पुरेसा अनुभव मिळायला हवा.''  

दरम्यान क्रिकेट क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी मलिंगाला शूभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :लसिथ मलिंगाश्रीलंकाबांगलादेश