भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करत आहे. मागील ७-८ दिवसांपासून दररोज साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. मृत्यूदरही मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्यात देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा तडफडून मृत्यू होत आहे. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्यापरीनं सर्वतोपरी प्रयत्न करतान दिसत आहेत. असाच एक व्यक्ती त्याच्या आजारी वडिलांसाठी इंडिगो फ्लाईटमधून ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात होता. बंगळुरू ते दिल्ली असा तो प्रवास करत होता, परंतु दुर्दैवानं त्याचा हा ऑक्सिजन सिलेंडर बोर्डिंगच्यावेळी चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) एका सदस्यानं चुकून टीम लगेज समजून स्वतःसोबत नेला. Sachin Tendulkar : 'क्रिकेटचा देव' मदतीला धावला; 'मिशन ऑक्सिजन'साठी सचिन तेंडुलकरची १ कोटींची मदत!
अन्वर असे त्या अज्ञात व्यक्तिचे नाव आहे आणि दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या वडिलांसाठी तो ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जात होता. पण, दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्याचे सामना गायब झालेले त्याला कळले आणि त्याच्यासाठी त्याला २४ तास शोधाशोध करावी लागली. विमानतळावरील अधिकाऱ्यांशी तो सातत्यानं चर्चा करत होता आणि अखेर CCTV फुटेजमध्ये त्याचा ऑक्सिजन सिलेंडर चेन्नई सुपर किंग्सच्या सदस्यानं चूकून सोबत नेल्याचे समोर आले, IPL 2021 : पराभवानंतर राजस्थान रॉयल्सला मिळाली आनंदवार्ता; द. आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज ताफ्यात दाखल
CSKचे सर्व खेळाडू चार्टर्ड विमानानं दिल्लीत दाखल झाले, शिवाय या एका सदस्याला सोडून. हा सदस्य नियमीत विमानातून बंगळुरूहून दिल्लीत दाखल झाला. त्याचे सामना सॅनिटाईझ करण्यासाठी एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते. योगायोगानं अन्वर याचेही सामान त्याच रुममध्ये होते. २७ एप्रिलच्या रात्री त्याचे सामाना इंडिगो अधिकाऱ्यांना देण्यात आले. अन्वरला ते ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.