भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; दिल्ली क्रिकेटचा 'बादशाह' हरपला

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:55 PM2023-08-03T15:55:31+5:302023-08-03T15:59:36+5:30

whatsapp join usJoin us
Manager of India’s T20 2007 World Cup winning squad Sunil Dev passes away at age of 75  | भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; दिल्ली क्रिकेटचा 'बादशाह' हरपला

भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर काळाच्या पडद्याआड; दिल्ली क्रिकेटचा 'बादशाह' हरपला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या विश्वविजेत्या संघाचे मॅनेजर सुनिल देव यांचे निधन झाले असून त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब पटकावला. तेव्हा देव यांच्याकडे भारताच्या संघ व्यवस्थापनाची जबाबदारी होती. मोठ्या कालावधीपासून आजाराशी लढत असलेल्या देव यांची बुधवारी प्राणज्योत मालवली. त्यांनी ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २०१५ पर्यंत DDCA मध्ये राहिलेल्या देव यांनी बीसीसीआयच्या विविध उपसमित्यांवर काम केले आहे.

दरम्यान, २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये पदार्पणाचा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सुनिल देव प्रशासकीय व्यवस्थापक होते. १९९६च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात देखील ते भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक होते. देव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला चांगले दिवस आल्याचे बोलले जाते.

दिल्ली क्रिकेटमध्ये देव यांचा दबदबा 
सुनिल देव यांचा दिल्ली क्रिकेटमध्ये चांगलाच दबदबा होता. याची कल्पना यावरून केली जाऊ शकते की, १९९० ते २००० दरम्यान एक काळ असा होता की त्यांच्या इशाऱ्याशिवाय रणजी ट्रॉफी किंवा कोणत्याही वयोगटातील संघाची घोषणा केली जात नव्हती. प्रसिद्ध पत्रकार जेम्स स्टिल, द इकॉनॉमिस्टचे आशिया संपादक यांनी त्यांच्या 'द ग्रेट तमाशा' या पुस्तकात सुनिल देव यांच्याशी झालेल्या त्यांच्या भेटीची आणि सामन्याच्या तिकीट विक्रीबद्दलच्या नाट्यमय घडामोडी सांगितल्या आहेत. 

पत्रकार अन् सुनिल देव
सुनिल देव विनोदी शैलीचे असल्याचे जाणकार सांगतात. सुनिल देव यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक मनोरंजक कथा आहेत. जेव्हा ते पत्रकारांसोबत फावल्या वेळेत बोलत असत तेव्हा ते त्यांना मजेदार किस्से सांगत असत. विराट कोहली नावाचा १७ वर्षांचा मुलगा त्याच्या SUV मधून ड्रायव्हिंग कसा शिकला हेही त्याने सांगितले होते. 
 

Web Title: Manager of India’s T20 2007 World Cup winning squad Sunil Dev passes away at age of 75 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.