नवी दिल्ली ।
भारतीय क्रिकेट संघातील अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी आपली सुरूवात शानदार करून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मात्र खराब फॉर्ममुळे काही खेळाडूंचं करिअर संपुष्टात आलं. मात्र भारतीय संघातील एक असा देखील खेळाडू आहे ज्याचं करिअर दारूच्या व्यसनामुळं धोक्यात आलं. या खेळाडूनं वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करून सर्वांचीच मनं जिंकली होती.
अवघ्या १७ व्या वर्षात भारतीय संघात पदार्पण
सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखलं जातं. सचिनच्या अगोदर हा रेकॉर्ड १९६५ मध्ये पुण्यात जन्मलेल्या मनिंदर सिंगच्या नावावर होता. त्यानं वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी पाकिस्तानविरूद्ध सामना खेळला होता. मनिंदर सिंगनं सुरूवातीला शानदार प्रदर्शन केलं मात्र कालांतरानं खराब फॉर्म आणि मानसिक तणावामुळे त्याचं करिअर संपुष्टात आलं.
दारूच्या व्यसनानं करिअर संपलं
मनिंदर सिंगचा फॉर्म खराब होत गेल्यानं त्याला १९९० मध्ये संघातून पायउतार व्हावं लागलं. विशेष म्हणजे त्यानं १९९४ मध्ये संघात पुनरागमन करताना ७ बळी देखील घेतले होते, मात्र तो संघातील आपलं स्थान कायम राखू शकला नाही. मनिंदरचं करिअर केवळ २७ व्या वर्षी संपुष्टात आलं. संघातून बाहेर झाल्यानंतर तणावात आलेला मनिंदर दारू आणि अमली पदार्थांचा शिकार झाला.
आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न
दरम्यान, मनिंदर सिंगची तुलना महान फिरकीपट्टू बिशन सिंग यांच्यासोबत केली जात होती. संघातून पायउतार झाल्याच्या तणावामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग देखील अवलंबला होता, ज्याला त्याने नंतर फक्त एक अपघात असल्याचे म्हटलं. यामुळे तो अमली पदार्थांचे सेवन करू लागला होता, त्याला पोलिसांनी अटकही केली होती. नंतर त्याची या नशेतून सुटका झाली. मनिंदर सिंगनं भारतासाठी ३५ कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याने ८८ बळी पटकावले. तर ५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ६६ बळींची नोंद आहे.
Web Title: Maninder Singh career ended with alcoholism, he made his debut for the Indian team at just 17 years old
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.