भारताचा आणखी एक क्रिकेटपटू करणार अभिनेत्रीशी लग्न

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे लवकरच बोहोल्यावर चढणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:15 PM2019-10-10T13:15:43+5:302019-10-10T13:16:35+5:30

whatsapp join usJoin us
Manish Pandey all set to enter wedlock with South Indian actress Ashrita Shetty | भारताचा आणखी एक क्रिकेटपटू करणार अभिनेत्रीशी लग्न

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू करणार अभिनेत्रीशी लग्न

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्याच्या लग्नाची घोषणा करण्यात आली असून त्याची भावी पत्नी अभिनेत्री आहे. 30 वर्षीय मयांक दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह करणार आहे आणि त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली आहे.


मनीष सध्या विजय हजारे चषक स्पर्धेत कर्नाटक संघाने नेतृत्व सांभाळत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तो भारतीय संघासोबत होता. शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 संघातही त्याचा समावेश करण्यात आला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिले शतक ठोकणाऱ्या मनीषचे लग्न येत्या 2 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत त्याचा विवाह होणार आहे. मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत. 


अश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. 26 वर्षी अश्रितानं  Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती आर पन्नीर्सेलवम यांच्या दिग्दर्शीत चित्रपटातही दिसणार आहे. 


मनीषच्या लग्नाला केवळ नातेवाईक आणि काही जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहेत. त्याच्या लग्नाला भारतीय संघातील सर्व खेळाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी मुंबईत असण्याची शक्यता आहे. 


मनीषने भारताकडून 23 वन डे सामन्यांत 1 शतक व 2 अर्धशतकांसह 440 धावा केल्या आहेत.  31 ट्वेंटी-20 सामन्यांत त्यानं 37.66च्या सरासरीनं 565 धावा केल्या आहेत. 

Web Title: Manish Pandey all set to enter wedlock with South Indian actress Ashrita Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.