Join us

आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर

आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 19:28 IST

Open in App
ठळक मुद्देआतापर्यंत अरबाजने जवळपास 2.8 कोटी रुपये सट्टेबाजीमध्ये गमावले आहेत. पण हे पैसे त्याने अजूनही सट्टेबाजांना दिलेले नाहीत.

मुंबई : आयपीएलमधील सट्टेबाजीत सलमान खानचा भाऊ अरबाजचे नाव पुढे आल्यावर बऱ्याच जणांना धक्का बसला होता. पण या प्रकरणात आता बरेच धक्के बसणार असल्याची माहिती पुढे येत आहे. कारण आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी असल्याची माहिती सोनू जालन या सट्टेबाजाने ठाणे क्राईम ब्रँचला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

सट्टेबाज सोनूला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली आणि आयपीएलध्ये कशी सट्टेबाजी होते, याचा उलगडा त्यांना झाला. सोनुने दिलेल्या माहितीनुसार अरबाज हा आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावायचा. आतापर्यंत अरबाजने जवळपास 2.8 कोटी रुपये सट्टेबाजीमध्ये गमावले आहेत. पण हे पैसे त्याने अजूनही सट्टेबाजांना दिलेले नाहीत.

अरबाजबरोबरच बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी आयपीएलमध्ये सट्टेबाजी करत होते, अशी खबळजनक माहिती सोनुने ठाणे क्राईम ब्रँचला दिली आहे. पण ठाणे क्राईम ब्रँचने अजूनही या सेलिब्रेटींची नावं उघड केलेली नाहीत. शनिवारी त्यांनी अरबाजला चौकशीसाठी बोलावले आहे. या चौकशीमध्ये कोणत्या बॉलीवूड सेलिब्रटींची नावं पुढे येतात, हे ठाणे क्राईम ब्रँच पाहणार आहे. त्यानंतर या बॉलीवूडच्या सेलिब्रटींना ठाणे क्राईम ब्रँच समन्स बजावणार आहे.

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेट सट्टेबाजीक्रिकेट