Join us  

दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदी 999 बळी टिपणारा खेळाडू 

नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिका तगड्या इंग्लंड संघाचा समाना करणार आहे. त्यात चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 6:52 PM

Open in App

दक्षिण आफ्रिकेला नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. संघाचा माजी यष्टिरक्षक मार्क बाउचर याच्याकडे आता आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. भारत दौऱ्यावर हंगामी प्रशिक्षक असलेले एनोच नॅक्वे आता सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत.  ''युवा आणि अनुनभवी खेळाडूंना पुढील आव्हानांसाठी सज्ज करण्याची धमक बाउचरमध्ये आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा संघाला होईल,''असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथनं सांगितलं.

यावेळी फॅफ ड्यू प्लेसिसकडे कसोटी संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले, तर अॅशवेल प्रिंस आफ्रिका अ संघाचे नेतृत्व सांभाळेल.  43 वर्षीय बाउचरकडे टायटन्स संघाच्या प्रशिक्षकाचा अनुभव आहे. ऑगस्ट 2016 पासून तो या पदावर आहे. शिवाय मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20तील त्श्वाने स्पार्टन्स संगाच्या सहाय्याक स्टाफमध्येही त्याचा सहभाग आहे. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यानं 147 कसोटी, 295 वन डे आणि 25 ट्वेंटी-20 सामने खेळले आणि यष्टिंमागे जवळपास 999 बळी टिपले. बाउचरच्या मार्गदर्शनाखाली आफ्रिका तगड्या इंग्लंड संघाचा समाना करणार आहे. त्यात चार कसोटी, तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

टॅग्स :द. आफ्रिकाइंग्लंड