जोहान्सबर्ग : एडेन मार्करम याने झळकाविलेल्या मालिकेतील दुसऱ्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ६ बाद ३१३ धावा केल्या. मार्करमने २१६ चेंडूत १७ चौकार व एका षटकारासह १५२ धावांची खेळी केली. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली.
मार्करामच्या धडाक्यानंतर आॅस्टेÑलियाने अंतिम सत्रात पुनरागमन करत झटपट चार बळी मिळवले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा टेम्बा बवुमा (२५*) आणि क्विंटन डीकॉक (७*) खेळपट्टीवर होते. पॅट कमिन्सने ५३ धावांत ३, तर चॅड सेयर्सने ६४ धावांत २ बळी घेत चांगला मारा केला.
तिसरा कसोटी सामना चेंडूच्या छेडछाड प्रकरणामुळे गाजला. ज्यामुळे आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वषार्ची बंदी लावण्यात आली. आज मात्र सामना खेळभावनेने पुन्हा सुरू झाला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी राष्ट्रगीतानंतर एकमेकांशी हस्तांदोलन दिले. वाद विसरून खेळाडू मैदानात उतरले.
यजमान कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि आॅसी कर्णधार टिम पेन यांनी नाणेफेकीपूर्वी एकमेकांशी बातचीत केली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मार्करमने जबरदस्त फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला बळकट केले. त्याचे हे कसोटीतील चौथे शतक आहे. आॅफ स्पिनर नाथन लियोन याने डीन एल्गर याला १९ धावांवर बाद केले. हाशिम आमला (२७) पॅट क्युमिन्सच्या चेंडूवर दुसºया स्लीपमध्ये पीटर हॅडसकोंबकडे झेल देऊन बाद झाला. अनुभवी एबी डिव्हिलियर्सने (६९) शानदार अर्धशतकी खेळी करत मार्करमला चांगली साथ दिली. या दोघांनी १०५ धावांची भागीदारी करुन आॅसीला दडपणाखाली आणले. (वृत्तसंस्था)
आफ्रिकेच्या समर्थकांनी उडवली कांगारुंची खिल्ली
चेंडू छेडछाड प्रकरण विसरून खेळाडूंनी चौथ्या कसोटीला सुरुवात केली खरी; पण द. आफ्रिकन समर्थकांनी मात्र आॅस्ट्रेलियन खेळाडूंची खिल्ली उडवली. आफ्रिकन चाहत्यांनी ‘सॅँडपेपर स्पेशल, केवळ १० रॅँडमध्ये’ असे लिहिलेले बॅनर उंचावले. हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘आमच्याकडे सॅँडपेपर केवळ १० रॅँडमध्ये उपलब्ध आहेत, पाहिजे असेल तर घ्या...’ असे बॅनरवर लिहिले होते.
Web Title: Mark Cumm's half century; After Africa 6313
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.