Join us  

मार्क वॉने दिला राजीनामा

आॅस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वॉ याने निवडकर्ते पदाचा राजीनामा दिला. समालोचक असलेल्या वॉचा समालोचनाचा करार ३१ आॅगस्ट रोजी संपणार असला तरी त्याने नूतनीकरण केलेले नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:33 AM

Open in App

सिडनी : आॅस्ट्रेलियाचा महान फलंदाज मार्क वॉ याने निवडकर्ते पदाचा राजीनामा दिला. समालोचक असलेल्या वॉचा समालोचनाचा करार ३१ आॅगस्ट रोजी संपणार असला तरी त्याने नूतनीकरण केलेले नाही. इंग्लंड- झिम्बाब्वे दौऱ्यापर्यंत तो पॅनलमध्ये कायम असेल.वॉ म्हणाला,‘गेली चार वर्षे सहकारी निवडकर्ते, कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंसोबत काम करणे आनंददायी होते. सर्वच प्रकारात आॅस्ट्रेलियन खेळाडूंच्या कामगिरीवर गर्व वाटतो. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची फळी असल्याने आगामी काळातही संघाची कामगिरी उंचावेल.’निवड समितीत आता ट्रॅव्हर हान्स, ग्रेग चॅपेल आणि नवे कोच जस्टिन लेंगर यांचा समावेश असून वॉ ची जागा घेणा-या नव्या व्यक्तीचे नाव जाहीर झाले नाही. मार्क वॉ आता ‘फॉक्स स्पोर्टस्’साठी काम करणार आहे. या चॅनेलने सहा वर्षांसाठी प्रसारण अधिकार खरेदी केले. (वृत्तसंस्था)