Join us

अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)

Marnus Labuschagne, Fielding Video: VIDEO: अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये मार्नस लाबूशेनने असा उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 20:29 IST

Open in App

Marnus Labuschagne, Fielding Video: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू हे मैदानावरील आक्रमक पवित्र्यासाठी ओळखले जातात. पण ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेन हा मैदानात कायम मजा-मस्ती करत असतो. फलंदाजीसह लाबूशेन फिल्डिंगमध्येही अप्रतिम कामगिरी करतो. वेळप्रसंगी तो गोलंदाजीही करताना दिसतो. आजही लाबूशेन एका सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी आला. स्वत:च्या गोलंदाजीसाठी फिल्डिंग लावताना त्याने असे काही केले की, त्याच्या अनोख्या विनोदी शैलीमुळे सारेच चकित झाले. इतकेच नव्हे तर मार्नस लाबूशेनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मार्नस लाबूशेनचा व्हिडिओ हा ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. मार्नस लाबूशेनने कर्णधार बनल्यानंतर वेगवान गोलंदाजी सुरू केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मार्नस लाबूशेन हा अनेकदा लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसला आहे. पण मार्नस लाबूशेनने वेगवान गोलंदाजी टाकायची ठरवली आणि फिल्डिंग सेट केली. यात त्याने एक फिल्डर चक्क अंपायरच्या रेषेत उभा केला. पाहा व्हिडीओ-

मार्नस लाबूशेनने अशाप्रकारे लावलेली फिल्डिंग पाहून क्रिकेट चाहत्यांना हसू अनावर झाले. या व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आणि व्हिडीओ शेअरदेखील केला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियाऑफ द फिल्डसोशल व्हायरल