सिडनी : भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने सोमवारी संघाची घोषणा केली. १८ सदस्यीय संघात मार्नस लाबुशेनला स्थान न मिळाल्याने विश्वचषक खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरला मात्र स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाने नुकताच भारत दौरा केला, त्यावेळी लाबुशेन संघात होता. लाबुशेनने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत केवळ ४३ धावा केल्या होत्या. पदार्पण केल्यापासून लाबुशेनने ऑस्ट्रेलियासाठी ३० सामने खेळले असून, त्यात ३१.३७ च्या सरासरीने केवळ ८४७ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका दौरा, भारत दौरा आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, सीन एबोट, ॲश्टन एगर, ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, ॲरोन हार्डी, जोस हेझलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मार्कस स्टोयनिस, ॲडम झम्पा आणि ट्रॅव्हिस हेड.
मिशेल मार्श टी-२० संघाचा कर्णधारदक्षिण आफ्रिका दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघाचे नेतृत्व मिशेल मार्श करणार आहे. तेथे ३० ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि ३ सप्टेंबर रोजी सामने खेळले जातील. मार्शकडे या प्रकारात कायमस्वरूपी नेतृत्व सोपविण्यात आलेले नाही. २०२२ ला विश्वचषकात ॲरोन फिंच कर्णधार होता. त्यानंतर तो निवृत्त झाला. विश्वचषकापासून ऑस्ट्रेलियाने एकही टी-२० सामना न खेळल्याने नव्या कर्णधाराचीही गरज भासली नव्हती.
पॅट कमिन्स पाचव्या ॲशेस कसोटीदरम्यान मनगटाला दुखापत असताना खेळला होता. तो दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका खेळू शकणार नाही, मात्र तेथे वनडे आणि त्यानंतर भारत दौऱ्यात वनडे मालिका खेळेल. पॅट सहा आठवडे पुनर्वसन कार्यक्रमात राहणार आहे; पण विश्वचषकाआधी तो पुरेसे सामने खेळणार असल्याने तयारीसाठी उपयुक्त ठरू शकतील.’- जॉर्ज बेली, निवड समितीप्रमुख सीए.