बंगळुरू : कर्णधार मिशेल मार्शच्या संयमी खेळीमुळे नाबाद ८६ धावांच्या खेळीमुळे आॅस्ट्रेलिया ए संघाने भारत ए संघाविरोधात दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सहा गडी गमावत २९० धावा केल्या. आॅस्ट्रेलिया ए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सहा बाद १८० धावा अशी स्थिती आॅस्ट्रेलियाची होती. मार्श आणि जलदगती गोलंदाज मायकेल नेसर (नाबाद ४४) यांनी सातव्या गड्यासाठी नाबाद ११० धावांची भागीदारी केली. मार्श याने १५१ चेंडूंत १३ चौकार लगावले आहेत, तर नेसर याने १०८ चेंडूंत ६ चौकार लगावले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर होते.
सलामीवीर कुर्टिस पॅटरसन (४८) आणि ट्रॅविस हेड (६८) यांनी दुसºया गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मधली फळी कोलमडली.
चायनामन कुलदीप यादव आणि शाहबाज नदीम हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर कृष्णप्पा गौतम आणि रजनीश गुरबानी यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
Web Title: Marsh's batting helped Australia's Abe score at 290
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.