Legend 90 League : क्रिकेट जगतात सध्या छोट्या प्रारुपातील लीगची लोकप्रियता वाढत आहे. लीजेंड्स ९० लीग (Legend 90 League) हा त्यातलाच एक प्रकार. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचं मैदान गाजवणारे अनेक माजी खेळाडू १५ षटकांच्या सामन्यातील लीगमध्ये फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहे. या लीगमध्ये न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाजाने धमाकेदार इनिंगसह लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. मार्टिन गप्टिलनं ३०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा कुटत १६० धावांची खेळी केलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१६ षटकार अन् १४ चौकारांची 'बरसात'
मार्टिन गप्टिलनं आपल्या स्फोटक खेळीत १६ षटकार आणि १४ चौकारांचा नजराणा पेश केला. लीजेंड्स लीगमधील आटा सामना छत्तीसगड वॉरियर्स विरुद्ध बिग बॉइज यूनिकारी या दोन संघात खेळवण्यात आला. या सामन्यात मार्टिन गुप्टिलनं नाबाद १६० धावांची खेळी केली. गप्टिल या लीगमध्ये छत्तीसग वॉरियर्स संघाकडून मैदानात उतरला आहे.
३०० प्लेस स्ट्राइक रेटनं कुटल्या नाबाद १६० धावा
गप्टिल आणि ऋषि धवन या जोडीनं बिग बॉइज यूनिकारी संघाच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. या दोघांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर छत्तीसगडच्या संघानं १५ षटकांत धाावफलकावर २४० धावा लावल्या. गप्टिलनं १६० धावा काढताना फक्त ४९ चेंडूत काढल्या. त्याचे स्ट्राइक रेट ३२६.५३ च्या घरात होते.
असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज
मार्टिन गप्टिलनं आपल्या कारकिर्दीत तुफान खेळीसह अनेक विक्रम केले आहेत. पण आता लीजेंड्स लीगमध्येही तो धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. मार्टिन गप्टिल खेळत असलेली स्पर्धा टी-२० फॉर्मेटमध्ये खेळवली जात नाही. पण त्यापेक्षा कमी षटकांच्या सामन्यातही ३०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटसह १६० धावा करण्याचा खास विक्रम त्याने सेट केला आहे. टी-२० च्या आतापर्यंतच्या इतिहासात १६ फलंदाजांनी १५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. पण यातील एकानेही ३०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा काढलेल्या नाहीत.