Fire in Pakistan Cricket Stadium: पाकिस्तानमधील कराची स्टेडियममध्ये २५ जानेवारीच्या रात्री मोठी आग लागल्याची घटना घडली. पाकिस्तान सुपर लीग २०२२ स्पर्धा सुरू होण्याआधी कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये आग लागली. विजेच्या तारांमुळे ही आग लागल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे मैदानाच्या आत बांधलेला तात्पुरता कॉमेंटरी बॉक्सही जळून खाक झाला. हा कॉमेंट्री बॉक्स विशेषकरून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेसाठी तयार करण्यात आला होता. नॅशनल स्टेडियममध्ये लागलेल्या आगीत बरंच नुकसान झालं. सीमारेषेवर लावण्यात आलेल्या जाहिरातीच्या फलकांच्या तारा खराब झाल्या. डिजिटल जाहीरातींच्या बॅनरचेही नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणीही या आगीत जखमी झाल्याचं वृत्त नाही.
स्टेडियमला लागलेल्या आगीचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. त्यात धुराचे लोटच्या लोट उठताना दिसत आहेत. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने सांगितल्यानुसार वेल्डिंग मशीनमुळे आग लागली. पण आगीचं कारण अधिकृतपणे अद्याप सांगण्यात आलेलं नाही.
२७ जानेवारीपासून कराची आणि लाहोरमध्ये सहा संघांची पाकिस्तान सुपर लीग टी२० क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा कराचीत सुरू होणार आहे. पहिला सामना मुलतान सुलतान आणि कराची किंग्ज यां दोन संघात होणार आहे. या स्पर्धेतील १५ सामने कराचीमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यानंतर १० फेब्रुवारीपासून लाहोरमध्ये सामने खेळले जाणार आहेत. २७ फेब्रुवारीला लाहोरमध्ये प्ले-ऑफ आणि फायनलचे सामने होणार आहे.
Web Title: Massive Fire outbreak in Pakistan Karachi National Stadium before PSL 2022 about to begin Viral going Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.