मास्टर ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-19 संघात निवड

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात निवड झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 01:13 PM2017-09-11T13:13:48+5:302017-09-11T13:20:18+5:30

whatsapp join usJoin us
Master Blaster's son Arjun Tendulkar's selection in the Mumbai Under-19 squad | मास्टर ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-19 संघात निवड

मास्टर ब्लास्टरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर-19 संघात निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात निवड झाली आहे.17 वर्षीय अर्जुन तेंडुलकर जेवाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे.

मुंबई, दि. 11-  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबई अंडर-19 संघात निवड झाली आहे. 17 वर्षीय अर्जुन तेंडुलकर जे.वाय लेले इंडिया इन्व्हिटेशनल वन डे स्पर्धेत मुंबईकडून खेळणार आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघातून खेळला आहे. आता तो मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातून खेळणार आहे. या संघात निवड होणे ही अर्जुन तेंडुलकरसाठी महत्त्वाची संधी आहे

बडोद्यात 16 ते 23 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी अर्जुन मुंबईच्या चौदा वर्षांखालील आणि सोळा वर्षांखालील संघाकडून खेळला आहे.

डावखुरा गोलंदाज अर्जुनने फेकलेल्या यॉर्करमुळे इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरेस्टोच्या पायाला दुखापत झाली होती. यामुळे बेअरेस्टोला क्रिझ सोडून जावं लागलं होतं. लॉर्ड्सजवळच सचिन तेंडुलकरने एक घर घेतलं आहे. त्यामुळे जलदगती गोलंदाज अर्जुनला इंग्लंड टीमसोबत सराव करण्याची संधी मिळते.

मुंबई अंडर-19 संघात या खेळाडुंचा समावेश
अग्नी चोप्रा, दिव्यांश सक्सेना, भूपेन लालवानी, अंजदीप लाड, सागर चबेरिया, शोएब खान, सत्यलक्ष्य जैन, वेदांत मुरकर, ध्रुव ब्रिड, तानुश कोटियन, नकुल मेहता, फरहान काजी, अथर्व अंकोलेकर, अभिमन्यू वशिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पाराशर, सक्षम झा, सिल्वेस्टर डिसुजा.
 

Web Title: Master Blaster's son Arjun Tendulkar's selection in the Mumbai Under-19 squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.