IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; मॅच रद्द झाल्यास कसा असेल भारताचा मार्ग, जाणून घ्या

टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा तिसरा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरूद्ध होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:42 PM2022-11-01T19:42:46+5:302022-11-01T19:44:29+5:30

whatsapp join usJoin us
match between India and Bangladesh will be played in Adelaide but according to Weather.Com there is a chance of rain | IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; मॅच रद्द झाल्यास कसा असेल भारताचा मार्ग, जाणून घ्या

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट; मॅच रद्द झाल्यास कसा असेल भारताचा मार्ग, जाणून घ्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा तिसरा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरूद्ध होणार आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला तर संघ उपांत्य फेरीकडे कूच करेल. त्यामुळे उद्या होणारा सामना भारतासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. मात्र या सामन्यात पावसाची बॅटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डलेड येथे होणाऱ्या सामन्यावर खराब हवामानाचे सावट आहे. कारण आजच्या दिवशी सामन्याच्या ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे उद्या पाऊस सामन्यात व्यत्यय आणण्याची शक्यता आहे.

भारत-बांगलादेशचा सामना दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. आता मंगळवारी पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे बुधवारी हवामान स्वच्छ असू शकते. पण ऑस्ट्रेलियामध्ये सध्या ज्या प्रकारचे वातावरण आहे, ते पाहता सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. बुधवारच्या अंदाजावर नजर टाकली तर पावसाची शक्यता 20 टक्के आहे.

Weather.Com नुसार बुधवारी दिवसभरात डलेडमध्ये सुमारे 20 टक्के पाऊस पडू शकतो. तर सायंकाळच्या सुमारास 50 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी डलेडमध्ये दिवसा 16 अंश आणि रात्री 10 अंश तापमान अपेक्षित आहे. खरं तर या विश्वचषकात पावसामुळे अनेक संघाना फटका बसला आहे. काही सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द देखील करण्यात आले. पावसाच्या बॅटिंगमुळे गुणतालिकेवर मोठा परिणाम झाला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या मार्गात पाऊस येणार नाही ना अशी भीती चाहत्यांना आहे.  

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल? 
भारतीय संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 2 विजय आणि एका पराभवासह रोहित सेनेच्या खात्यात 4 गुणांची नोंद आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला ब गटाच्या दुसऱ्या स्थानावर आहे. भारत-बांगलादेश सामना अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळेल. म्हणजेच भारत आणि बांगलादेश या दोन्हीही संघाचे एकूण 5-5 असे गुण होतील. अर्थात दोन्हीही संघ गुणांच्या बाबतीत बरोबरीत असतील. मात्र भारताचा नेटरनरेट जास्त असल्यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल. या सामन्यानंतर भारताचा झिम्बाब्वेविरूद्ध तर बांगलादेशचा पाकिस्तानविरूद्ध सामना होणार आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: match between India and Bangladesh will be played in Adelaide but according to Weather.Com there is a chance of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.