Join us

VIDEO: लाईव्ह सामन्यात 'फिक्सिंग'! जाणूनबुजून बाद झाला फलंदाज, क्रिकेट विश्वात खळबळ...

Match Fixing Video: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 20:02 IST

Open in App

Match Fixing Video: क्रिकेट सामन्यात स्पॉट फिक्सिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातील अनेक घटनांची जगभरात चर्चा झाली. आता कोलकात्याच्या फर्स्ट डिव्हिजन ग्रुप ए लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगची घटना घडली आहे. टाऊन क्लब आणि मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मोहम्मडन संघाचा फलंदाज जाणूनबुजून बाद होताना दिसतोय.

प्रथम फलंदाजी करताना टाऊन क्लबने 446 धावा केल्या. मोहम्मडन संघ फलंदाजीला आला तेव्हा सलामीवीर संबित रॉय 20 धावांवर फलंदाजी करताना संदीप तोमरच्या चेंडूवर संशयास्पदरित्या बाद झाला. या प्रकरणात कर्णधार दीप चॅटर्जीचाही सहभाग असू शकतो, असा खुलासा स्पोर्ट्झ पॉईंटने केला आहे. 

कर्णधार जीप चॅटर्जीदेखील स्टंपच्या अगदी जवळ असलेला तोमरचा चेंडू सोडत होता. अखेर तोमरच्या चेंडूवर चॅटर्जीदेखील बाद झाला. यानंतर नितीन वर्माचा निर्णयदेखील चकीत करणारा होता. फिरकी गोलंदाज सुदीप कुमार यादवविरुद्ध वर्माने पहिला चेंडू सोडला, पण नंतरच्या चेंडूंवर तोदेखील बाद होऊन पवेलियनमध्ये परतला. 

माजी क्रिकेटपटूंचा संतापबंगालचे माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी फेसबुकवर लिहिले की, कोलकाता क्रिकेट सर्किटमधील या घटना पाहून मी अत्यंत निराश आणि लाजलो आहे. त्यांनी या प्रकरणात मीडियाच्या हस्तक्षेपाची मागणी केली. 

टॅग्स :मॅच फिक्सिंगक्रिकेट सट्टेबाजीसोशल मीडिया