Join us

ICC Champions Trophy : हायब्रिड मॉडेल फक्त भारतीय संघासाठी; पंचासाठी नाही, कारण...

भारतीय संघाचे स्पर्धेतील सर्व सामने दुबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 19:14 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आठ संघ सहभागी संघाची घोषणा झाली आहे. आता आयसीसीच्या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी १२ अंपायर्स आणि ३ मॅच रेफ्रींची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान यजमानपद भूषवत असलेल्या या स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघानं पाकमध्ये खेळण्यास नकार दिला होता. परिणामी हायब्रिड मॉडेलनुसार ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील सर्व सामने दुबईत होणार आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाकला जाण्यास भारतीय पंचाचा नकार, कारण...

भारतीय संघानंतर आता भारतीय पंचानेही पाकिस्तानमध्ये अंपायरिंग करण्याला नकार दिल्याचे समोर येत आहे. भारतीय पंचाने वैयक्तिक कारण देत या स्पर्धेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.  आयसीसीच्या एलिट पॅनलमधील भारतीय अंपायर नितिन मेनन यांनी पाकिस्तानला जाण्यान नकार दिला आहे.  पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  “आयसीसी नितीन मेनन यांनाही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या ऑफिशियल्समध्ये सहभागी करून घेण्यास इच्छूक होते. पण वैयक्तिक कारणास्तव त्यांनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार कळवला आहे." 

हायब्रिड मॉडेल फक्त संघासाठी, भारतीय पंचासाठी नाही, कारण...

भारतीय संघानं पाकला जाण्यास नकार दिल्यामुळे हायब्रिड मॉडेलनुसार संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्याचा तोडगा निघाला. मग पंचांसाठी या मार्गाने दुबईतील सामन्यासाठी हजेरी लावता आली नसती का? असा प्रश्न काहीजणांना पडू शकतो. आता भारतीय ऑफिशियल्स जाणीवपूर्वक पाक दौऱ्यापासून दूर राहिलेत का? हा एक वेगळा मुद्दा आहे. कारण त्यासंदर्भात अधिकृतरित्या तसं काही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण संघाप्रमाणे अंपायर किंवा ऑफिशियल्ससाठी हायब्रिड मॉडेलनुसार ठराविक शहरातील सामन्याची  जबाबदारी सोपविता येऊ शकत नाही. कारण अंपायर्स अन् ऑफिशियर्स हे तटस्थ असतात. त्यामुळे त्यांच्यासंदर्भात इकडे नाही फक्त तिकडे असा सीन लागूच होऊ शकत नाही.   

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी १२ पंच अन् ३ मॅच रेफ्रींची घोषणा

आयसीसीने बुधवारी १५ अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलीये. १९ फेब्रुवारीपासून ते ९ मार्च पर्यंत रंगणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत १२ पंच आणि ३ मॅच रेफ्रींचा समावेश आहे. यात नितीन मेनन यांचे नाव दिसत नाही. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड बून, श्रीलंकेचे रंजन मदुगले आणि झिम्बाब्वेचे  अँड्रयू पाइक्रॉफ्ट हे त्रिकूट मॅच रेफ्रीच्या भूमिकेत दिसेल.

 नितिन मेनन हे अनुभवी पंच

नितिन मेनन  हे एक अनुभवी पंच आहेत. आतापर्यंत त्यांनी ४० कसोटी सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. ४० पैकी ३० सामन्यात त्यांनी मैदानात अंपायरिंग केली असून १० सामन्यात त्यांनी तिसऱ्या पंचाची भूमिका बजावली आहे. वनडेत मेनन यांनी ७५ सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पंच -  

कुमार धर्मसेना, क्रिस गॅफनी, मायकल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, अहसान रजा, पॉल रीफेल, शरफुद्दौला इब्ने शाहिद, रॉडनी टकर, एलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन.

मॅच  रेफ्री

डेविड बून, रंजन मदुगले, अँड्रयू पाइक्रॉफ्ट

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीभारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीपाकिस्तान