Join us  

AUS vs SA: कोरोना पॉझिटिव्ह असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडू 'कसोटी' संघात, 4 वर्षांनंतर केलं पुनरागमन

कोरोना अजून गेलेला नाही आणि क्रिकेट सामन्यादरम्यान याचे ताजे उदाहरण सिडनीत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात दिसून आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 1:11 PM

Open in App

सिडनी : कोरोना अजून गेलेला नाही आणि क्रिकेट सामन्यादरम्यान याचे ताजे उदाहरण सिडनीत सुरू झालेल्या कसोटी सामन्यात दिसून आले. कारण ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 4 वर्षांनंतर परतलेल्या खेळाडूला कोरोना झाला आहे. लक्षणीय बाब म्हणजे कोरोनाची लक्षणे असतानाही तो ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. सध्या सुरू असलेल्या सिडनी येथील तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळत आहे. कांगारूच्या संघाचा खेळाडू मॅट रेनशॉ कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या सहकारी खेळाडूंपासून दूर दिसला होता. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना तो बाकीच्या सहकाऱ्यांपासून बाजूला होता मात्र आता अचानक त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

मॅट रेनशॉच्या प्रकृतीबद्दल स्पष्टीकरण देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "सिडनी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्याची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्याला संघापासून वेगळे करण्यात आले होते." रेनशॉची RAT चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही तो सिडनी कसोटीचा हिस्सा आहे. 

4 वर्षांनंतर रेशनॉचे संघात पुनरागमन 2018 नंतर रेनशॉचे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. तो सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याचे नाव आहे. मात्र, कोरोनामुळे तो आता क्षेत्ररक्षण करणार नाही. त्याच्या जागी पीटर हँड्सकॉम्बचा आपत्कालीन क्षेत्ररक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा 'कोरोना'त सामनाखरं तर यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कोरोना पॉझिटिव्ह असतानाही सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर ताहिला मॅकग्रा हिने कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही भारताविरुद्ध राष्ट्रकुल स्पर्धेचा अंतिम सामना खेळला. मॅथ्यू वेड इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-20 विश्वचषक सामना खेळणार होता, जो पावसामुळे रद्द करण्यात आला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाकोरोना वायरस बातम्यासकारात्मक कोरोना बातम्याद. आफ्रिका
Open in App