India vs Australia : वीरेंद्र सेहवागची बेबी सीटिंग, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू खवळला

India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 10:08 AM2019-02-12T10:08:20+5:302019-02-12T10:08:46+5:30

whatsapp join usJoin us
Matthew Hayden replies to Virender Sehwag's babysitting ad on Australia series | India vs Australia : वीरेंद्र सेहवागची बेबी सीटिंग, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू खवळला

India vs Australia : वीरेंद्र सेहवागची बेबी सीटिंग, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू खवळला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. पेनने यष्टीमागे टिप्पणी करताना पंतला माझ्या मुलांना सांभाळणार का? असे विचारले होते. त्यानंतरही हा सागा सुरूच आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ येथे दोन ट्वेंटी-20 व पाच वन डे सामने खेळणार आहेत. या दौऱ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने तयार केलीली जाहीरात सध्या व्हायरल होत आहे. या जाहीरातीत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग बेबी सीटरच्या भूमिकेत दिसत आहे. 

या व्हिडीओत सेहवाग ऑस्ट्रेलियाची जर्सी घातलेल्या लहान मुलांचे स्वागत आणि त्यांची देखभाल करताना दिसत आहे. '' जब हम ऑस्ट्रेलिया गये थे, तो उन्होने पूछा था बेबी सीटिंग करोगे? हमने कहा सबके सह आजाओ. जरूर करेंगे. ( जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो, तेव्हा त्यांनी आम्हाला बेबी सीटिंग करणार का, असे विचारले होते. तेव्हा आम्ही सांगितले सर्व जण या नक्की करू.)," असे विधान सेहवाग त्या व्हिडीओत करत आहे. 



ऑस्ट्रेलियाचा दिग्गद फलंदाज मॅथ्यू हेडनला ही जाहीरात काही आवडली नाही. त्यानं ऑस्ट्रेलियाला कमी लेखू नका, असा दम सेहवाग व त्या वाहिनीला भरला. 


 

Web Title: Matthew Hayden replies to Virender Sehwag's babysitting ad on Australia series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.