नवी दिल्ली : आपल्या विनोदी शैलीमुळे प्रसिद्ध भारताचा माजी सलामवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने अलीकडेच संपलेल्या आयपीएलमध्ये मोठ्या रकमेत करारबद्ध करण्यात आलेल्या काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीवर आपल्या शैलीत टीका केली.
सेहवागने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला १० कोटीचा ‘चीयरलीडर’ तर दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला देशी कट्टा म्हटला आहे.
आयपीएलने सेहवागचा गमतीशीर व्हिडिओ चाहत्यांना आवडला.
वीरेंद्र सेहवागने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला त्यात आयपीएल १३ मध्ये शानदार कामगिरी
करणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, केएल राहुल, हार्दिक
पांड्या, जोफ्रा आर्चर आणि कॅगिसो रबाडा यांची प्रशंसा केली, पण त्यानंतर तो आपल्या फॉर्मात परतला
आणि पाच खेळाडूंवर आपल्या शैलीत टीका केली. त्यात पहिले नाव
ग्लेन मॅक्सवेलचे आहे. सेहवाग म्हणाला,‘हा १० कोटी रुपयांचा चीयरलीडर पंजाबसाठी महागडा ठरला.
गेल्या काही मोसमात मॅक्सवेलच्या कामगिरीचा आलेख घसरता आहे. त्याने या मोसमात तर आपला विक्रम मोडला. मॅक्सवेलने १३ सामन्यात १५.४२ च्या सरासरीने केवळ १०८ धावा केल्या. त्याला या मोसमात एकही षटकार लगावता आला नाही.
सेहवागने मॅक्सवेल व्यतिरिक्त शेन वॉटसन, ॲरोन फिंच, आंद्रे रसेल आण डेल स्टेन यांच्यावर टीका केली.
स्टेन गेनला पहिले जग घाबरत होते. पण या आयपीएलमध्ये तो देशी कट्टा झाला. त्याच्या गोलंदाजीवर धावा फटकावताना बघितल्यानंतर डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, पण एक मात्र निश्चित या कट्ट्याला आता विकत घेणारा बाजारात कुणी मिळणार नाही. - वीरेंद्र सेहवाग
Web Title: Maxwell 10 crore cheerleader, Stan Deshi Katta
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.