रोहित नाईक | लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदाबाद : गेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेला पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर चार वर्ष अपार मेहनत घेत अखेर भारताने यंदा अंतिम फेरी गाठली. भारतीय शिलेदारांची विश्वविजेतेपदासाठी गाठ असेल ती ऑस्ट्रेलियाशी. याची पुरेपूर जाणीव असल्यानेच कोणतीही चूक न करण्याच्या निर्धारानेच ते खेळतील.
'विराट' आव्हान
विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध हमखास यशस्वी ठरला आहे. त्याने ४८ एकदिवसीय सामने खेळताना एकूण २३१३ धावा काढल्या आहेत. यामध्ये ८ शतकेही झळकावले.
पंतप्रधान मोदी सामना बघणार
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.
२००३ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. त्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने १० सामने जिंकले.
२०११ सालच्या विश्वचषकात यजमान भारताने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवत स्पर्धेबाहेर केले होते.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामने झाले. भारत दोन वेळा, तर ऑस्ट्रेलिया एकदा जिंकला.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यत १५० वनडे सामने झाले. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ८३, भारताने ५७ सामने जिंकले आहेत.
खेळपट्टी कुणाला अनुकूल?
नरेंद्र मोदी स्टेडिमवर इंग्लंड-न्यूझीलंड हा स्पर्धेतील पहिला सामना रंगला होता. या सामन्यांत चौकार-षटकारांचा पाऊस पडला. मात्र, नंतरच्या सामन्यात धावांचा पाऊस कमी झाला. कारण, ही खेळपट्टी नंतर फिरकीस पोषक ठरली. त्यामुळेच अंतिम सामन्यातही फिरकीस पोषक खेळपट्टी पाहण्यास मिळू शकते. पहिल्या डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना वाऱ्याची साथ मिळू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यास दोन्ही संघांचा प्रयत्न राहील.
Web Title: May India conquer the world in cricket; Prime Minister narendra Modi attends the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.