एकदिवसीयमध्येही छाप पाडू शकतो मयांक अगरवाल

विंडीजविरुद्ध रोहितला विश्रांती देऊन मयांकला संधी देण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:16 AM2019-11-18T01:16:34+5:302019-11-18T01:16:48+5:30

whatsapp join usJoin us
Mayank Agarwal can make an impression in ODIs as well | एकदिवसीयमध्येही छाप पाडू शकतो मयांक अगरवाल

एकदिवसीयमध्येही छाप पाडू शकतो मयांक अगरवाल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : मयांक अगरवालचा कसोटी क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजीमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये निवडीसाठी विचार होऊ शकतो. हा सलामीवीर वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवू शकतो. क्रिकेट जाणकारांच्या मते वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत उपकर्णधार रोहित शर्माला पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाºया न्यूझीलंड दौºयापूर्वी विश्रांती दिली जाऊ शकते आणि अशा स्थितीत अगरवाल सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

रोहित गेल्या काही महिन्यापासून सातत्याने खेळत आहे. भारतीय उपकर्णधार न्यूझीलंड दौºयात तीन प्रकारच्या क्रिकेटसाठी संघाचा महत्त्वाचा सदस्य राहील. या दौºयात भारताला पाच टी२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यात अगरवाल एक पर्याय ठरू शकतो. त्याने लिस्ट ‘ए’ मध्ये आतापर्यंत ५० पेक्षा अधिक सरासरी व १०० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या व्यतिरिक्त १३ शतके ठोकली आहेत.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक दीप दासगुप्ता यांना अगरवालला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी देणे काही चुकीचे वाटत नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका त्याच्यासाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते. दासगुप्ता म्हणाले,‘भारतीय संघव्यवस्थापनाच्या डोक्यात सलामीवीर फलंदाजाचा पर्याय म्हणून मयांकचे नाव आले तर चांगलेच आहे. खरे बघता तो पांढºया चेंडूचा नैसर्गिक खेळाडू असून त्याने लाल चेंडूच्या क्रिकेटनुसार स्वत:त बदल केला. त्याच्या प्रतिभेबाबत कधीच प्रश्न उपस्थित झालेला नाही. त्याच्याकडे सर्वप्रकारचे फटके आहेत. यापूर्वी तो सुरुवातीला वेगाने धावा फटकावल्यानंतर विकेट गमावत होता, पण आता तसे नाही.’ अगरवालने आपल्या कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात केली असून ८ कसोटी सामन्यात त्याच्या नावावर दोन द्विशतकांची नोंद आहे.

धवनच्या अपयशाचा मिळेल लाभ
प्रदीर्घ कालावधीपासून फॉर्मात नसलेला शिखर धवन आणि लोकेश राहुल व्यतिरिक्त एक अन्य पर्याय तयार करण्याची गरज अगरवालसाठी जमेची बाजू ठरू शकते. अगरवालला विश्वचषक स्पर्धेदरम्यान अखेरच्या सामन्यांसाठी दुखापतग्रस्त विजय शंकरच्या स्थानी संघात स्थान देण्यात आले होते. त्याला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही, पण कर्नाटकचा हा फलंदाज आपल्या आक्रमक खेळीमुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेट योजनेत सामील असल्याचे संकेत मिळाले आहे. अनेकांच्या मते भारतात २०२३ मध्ये होणाºया विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अगरवाल प्रदीर्घ कालावधीसाठी पर्याय ठरू शकतो. कारण कदाचित फॉर्मात नसलेला धवन त्यावेळी संघात नसेल.

Web Title: Mayank Agarwal can make an impression in ODIs as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.