मयांक अग्रवालच्या रूपात चांगला पर्याय!

आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात तिस-याच दिवशी भारतीय संघाने पकड मजबूत केली आहे. कारण भारताकडे ३४६ धावांची भक्कम आघाडी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:49 AM2018-12-29T04:49:16+5:302018-12-29T04:49:22+5:30

whatsapp join usJoin us
Mayank Agarwal is a good choice! | मयांक अग्रवालच्या रूपात चांगला पर्याय!

मयांक अग्रवालच्या रूपात चांगला पर्याय!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसºयाच दिवशी भारतीय संघाने पकड मजबूत केली आहे. कारण भारताकडे ३४६ धावांची भक्कम आघाडी आहे. आॅस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात १५१ धावाच करू शकला होता. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करणे सध्यातरी योग्य वाटत नाही. खेळपट्टीवर जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटूंना मदत मिळत आहे. अशा स्थितीत आॅस्ट्रेलिया ३०० हून अधिक धावा करतील? हा...परंतु, क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते, तरीही स्थितीचा विचार करता भारतीय संघाने विजयाकडे कूच केली आहे, हे मात्र नक्की.

आॅस्ट्रेलियाला हा सामना वाचवण्यासाठी एकच गोष्ट मदत करू शकते. ती गोष्ट म्हणजे पाऊस. कारण रविवारी वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, हा सामना उद्याच संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असावा आणि त्यांना तशी संधी सुद्धा आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या रुपात भारताला चांगला गोलंदाज मिळाला आहे. गेल्या वर्षी ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करीत होता त्यावरून असे वाटत होते की हा केवळ ‘वाईडबॉल स्पेशालिस्ट’ आहे. परंतु, कसोटीत त्याने यावर्षी ज्या पद्धतीने सुरुवात केली,स्वत:ला विकसित केले, त्यावरून तो प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरणार गोलंदाज आहे. आज त्याने ६ बळी घेतले. त्याच्याकडे उत्तम गती, स्विंग आणि अ‍ॅक्शन आहे. समोरील फलंजांच्या पुढे जाऊन विचार करण्याचे त्याचे कौशल्य आहे. तो चतूर आहे. या वर्षी विदेशात सर्वाधिक बळी घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे पुढेही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.

बुमराह, पृथ्वी शॉ यांनी ज्या पद्धतीने स्व:ला सिद्ध केले तसाचा खेळाडू मयांकही आहे. कारण तो ज्या स्थितीत भारतीय संघात आला. ती फार वेगळी होती. मालिका १-१ अशी बरोबरीवर होती. त्यामुळे या सामन्याचा भारतीय संघावर दबाव होता. व्यवस्थापन सलामीवीराच्या शोधात होते. त्याने पहिल्या डावात ७६ धावा केल्या. संयमाने खेळला. त्याच्यानंतर पुजारा-कोहली यांनी डाव पुढे नेला. दुसºया डावात पुजारा, कोहली, रहाणे झटपट बाद झाले. अशा स्थितीत मयांकने एक बाजू सांभाळत डाव पुढे नेला.

तो क्लासिकल फलंदाज आहे. विशेष म्हणजे, स्थितीनुसार खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. एक मोलाचा सलामीवीर फलंदाज भारताला मिळाला आहे. तो गेल्या चार वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असल्याने अनुभवी आहे. तो अशाच पद्धतीने खेळत राहिला तर ६-७ वर्षे आरामात खेळणार. एक चांगला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले तर ते योग्य ठरेल. उद्या आॅस्ट्रेलिया फलंदाजांना बुमराहकडून अधिक भीती असेल. आॅस्ट्रेलियाला त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

Web Title: Mayank Agarwal is a good choice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.