Mayank Agarwal Hits Consecutive Hundreds In Vijay Hazare Trophy : कर्नाटक संघाचे नेतृत्व करणारा मयांक अग्रवाल याचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील शतकी तोरा कायम आहे. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील चौथ्या फेरीतील अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सान्यात कर्नाटकच्या बॅटरनं आपला क्लास दाखवून देत अवघ्या ४५ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. अल्प धावसंख्येचा पाठलाग करतानाही त्याने शतकी डाव साधला. त्याच्या शतकाच्या जोरावर कर्नाटकच्या संघानं हा सामना १० गडी राखून जिंकला.
कर्नाटकनं ८६ चेंडूत जिंकला सामना, त्यात मयांकच्या सेंच्युरीसह अभिनवच्या भात्यातून आली फिफ्टी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी रंगलेल्या सामन्यात कर्नाटक संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार मयांक अग्रावालचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवत अरुणाचल प्रदशेच्या संघाला ४३. २ षटकात अवघ्या १६६ धावांवर रोखले होते. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करातना कर्नाटकच्या संघाने १४.२ षटकात म्हणजे ८६ चेंडूत सामना खिशात घातला. मयांक अग्रवालच्या शतकी खेळीशिवाय अभिनव मनोहर याने ४१ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार खेचले. मयांक अग्रवालची शतकी खेळी ७ चौकार आणि ७ षटकारांनी बहरलेली होती.
देशांतर्गत वनडेत कशी राहिलीये त्याची कामगिरी? विजय हजारे स्पर्धेतील मयांकच्या भात्यातून निघलेले हे सलग दुसरे शतक ठरले. याआधी त्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात १३९ धावांची कडक खेळी साकारली होती. स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्याने ४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुडुचेरी विरुद्धच्या लढतीत १८ धावांवर तो बाद झाला. पण त्यानंतर त्याने धमाकेदार कमबॅक करत पुन्हा एकदा आपल्या क्लास शोनं सर्वांचे लक्ष वेधून घेतली आहे. अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्याने २२२.२२ च्या स्ट्राईक रेटनं धावा कुटल्या.