Join us

१७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयांकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक

एक नजर तुफान फटकेबाजीसह शतकी नजराणा पेश करणाऱ्या फलंदाजांवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:31 IST

Open in App

एका बाजूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या फ्लॉप फलंदाजीची चर्चा सुरु असताना दुसऱ्या बाजूला देशांतर्गत क्रिकेटमधील धमाकेदारी खेळीसह काही खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांचे लक्षवेधून घेतले आहे. आयपीएलमध्ये अनसोल्डचा टॅग लागलेल्या मयंक अग्रवालपासून ते अभिषेक शर्मा आणि १७ वर्षीय मुंबईकर आयुष म्हात्रे यांचा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत बॅक टू बॅक हिट शो पाहायला मिळत आहे. विजय हजारे ट्रॉफी (VHT) स्पर्धेतील रविवारी झालेल्या वेगवेगळ्या सामन्यात तिघांनी धमाकेदार शतकी खेळीसह आपला जलवा दाखवून दिला. एक नजर तुफान फटकेबाजीसह शतकी नजराणा पेश करणाऱ्या फलंदाजांवर 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मयंक अग्रवालनं नोंदवली शतकी हॅटट्रिक

मयंक अग्रवाल विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतोय. नागालँड विरुद्धच्या सामन्यात ११२ चेंडूत ११९ धावांची दमदार खेळी केली. त्याचे स्पर्धेतील हे सलग तिसरे आणि एकूण चौथे शतक आहे.  यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मयंक अग्रवाल धावांची अक्षरश: बरसात करताना दिसतोय. स्प्धेतील ७ सान्यात त्याच्या भात्यातून ४ शतके आणि ५ अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. 

मुंबईकर आयुष म्हात्रेचा धमाक्यावर धमाका

मुंबईच्या ताफ्यातून खेळणारा १७ वर्षीय आयुष म्हात्रेही विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या वनडे स्पर्धेत धमाक्यावर धमाका करताना पाहायला मिळते. याच स्पर्धेत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नागालँड विरुद्ध त्याने ११७ चेंडूत १५ चौकार आणि ११ षटकारांसह १८१ धावांची खेळी केली होती. या खेळीसह यशस्वी जैस्वालचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात १५० धावा ठोकणारा फलंदाजही ठरला होता. 

पंजाबसाठी अभिषेक शर्माची धडाकेबाज खेळी

देशांतर्गत वनडे स्पर्धेत  पंजाब संघाचे नेवृत्व करणाऱ्या अभिषेक शर्माचाही जलवा पाहायला मिळतोय. पदुच्चेरी विरुद्धच्या सामन्यात ६२ चेंडूत अर्धशतकी खेळीनं लक्षवेधून घेतले. याआधीच्या सामन्यात त्याच्या भात्यातून १७० धावांची दमदार खेळी पाहायला मिळाली होती. याआधी सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात त्याने ९६ चेंडूत २२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १७० धावांची धमाकेदार खेळी केली होती. या स्पर्धेत आतापर्यंत अभिषेक शर्मानं सहा डावांमध्ये एका शतकासह दोन अर्धशतके झळकावली आहेत.

  

  

टॅग्स :विजय हजारे करंडकमयांक अग्रवालमुंबई