शतक झळकावण्याच्या कलेत मयांक अगरवाल आता ‘मास्टर’

मयांक अगरवाल दोन वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान कर्नाटक संघात आपल्या स्थानाबाबत निश्चित नव्हता, याचा विचारही आपण करू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 01:03 AM2019-11-18T01:03:08+5:302019-11-18T06:27:33+5:30

whatsapp join usJoin us
Mayank Agarwal is now a 'master' in the art of century century | शतक झळकावण्याच्या कलेत मयांक अगरवाल आता ‘मास्टर’

शतक झळकावण्याच्या कलेत मयांक अगरवाल आता ‘मास्टर’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...

टी२० मालिकेमध्ये बांगलादेशने जी प्रतिस्पर्धा दाखविली होती, ती इंदूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात क्षणिक भासली. प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा समावेश असलेल्या बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध पाहुणा संघ अगदी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे भासला. त्यांची अनुभवहीनता व दिग्गजांची उणीव चव्हाट्यावर आली. भारताचे तीन वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी व त्याचसोबत रविचंद्रन अश्विनचा उच्च दर्जाचा फिरकी मारा याचे बांगलादेशच्या फलंदाजांकडे कुठलेही उत्तर नव्हते. पहिल्या कसोटीत त्याच खेळाडूने वर्चस्व गाजवले ज्याने गेल्या ११ महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उंच भरारी घेतली आहे.

मयांक अगरवाल दोन वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान कर्नाटक संघात आपल्या स्थानाबाबत निश्चित नव्हता, याचा विचारही आपण करू शकत नाही. तो आत्ममूल्यांकन करू शकत नव्हता, पण त्यानंतर त्याने मानसिकतेसह तंत्रामध्ये बदल केला. प्रथम श्रेणी सामन्यात एक महिन्यात त्याने एक हजार धावा केल्या. नोव्हेंबर २०१७ मधील या कामगिरीनंतर मयांकचा दर्जा उंचावत गेला. कर्नाटकसह दक्षिण विभाग आणि भारत ‘अ’तर्फे मयांकने विविध प्रकारात हजारो धावा फटकावल्या. त्यामुळे राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्यात तो यशस्वी ठरला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याला संधी देण्यात आली आणि त्याने स्वत:चे स्थान पक्के केले.

मयांक आता शतक झळकावण्यात ‘मास्टर’ झाला आहे. केवळ शतकच नाही, तर त्याने द्विशतकेही झळकावली आहेत. गेल्या चार कसोटीत सामन्यात त्याने दोनदा आपल्या शतकाचे द्विशतकात रुपांतर केले. कसोटीत स्थान मिळवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या मयांकला आता संयम राखण्याचे मूल्य कळले आहे. फ्रंटफूटवर खेळणाऱ्या फलंदाजांचा आवडता फटका कव्हर ड्राईव्ह असतो.

मयांकने आपल्या फलंदाजीत अन्य बाबीतही सुधारणा केली. विशेषता आखूड टप्प्याच्या चेंडूविरुद्ध. एक सलामीवीर म्हणून फिरकी खेळण्यात तो माहिर आहे. त्याचे फुटवर्क सकारात्मक आहे. तो सहजपणे पुढे सरसावत षटकार ठोकतो असे नाही, तर बॅकफूटवर स्क्वेअरच्या दिशेनेही फटके मारतो. स्थानिक क्रिकेटमध्ये तो ज्या पद्धतीने धावा वसूल करतो तो फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मयांक वापरत आहे. दरम्यान, आता मी दुसºया कसोटी सामन्यासाठी अधिक उत्साहित आहे. कारण भारतातील तो पहिला दिवस-रात्र ऐतिहासिक कसोटी सामना असेल.
 

Web Title: Mayank Agarwal is now a 'master' in the art of century century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.