सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध पंजाब किंग्ज या संघांमध्ये रविवारी सुरू असलेल्या सामन्यात एक अजब योगायोग घडला. २०१४ साली SRH चे कर्णधारपद भूषवणारा शिखर धवन आज त्याच संघासमोर नव्या संघाचा कर्णधार म्हणून उभा ठाकला. टॉसच्या वेळी पंजाबकडून मयंक अग्रवालच्या जागी शिखर धवन आल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची धुलाई करणारा मयंक अग्रवाल पुढच्याच सामन्यात संघाबाहेर का गेला असावा? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला. पण अचानक झालेल्या या बदलाबाबत हंगामी कर्णधार शिखर धवनने माहिती दिली.
"मयंक अग्रवालच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. पुढच्या सामन्याआधी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि पुन्हा मैदानात उतरून त्याची जबाबदारी सांभाळेल. त्यामुळे आजच्या एका सामन्यासाठी हा बदल आहे. प्रभसिमरन सिंग त्याच्या जागी संघात सलामीवीराची भूमिका बजावेल. संघात बाकी कोणताही बदल नाही", असं शिखर धवन म्हणाला.
असे आहेत दोन्ही संघ-
पंजाब किंग्स: शिखर धवन (क), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (किपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (क), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (किपर), शशांक सिंग, जगदीशा सुचिथ, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, उमरान मलिक, टी नटराजन