Join us  

नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज

१५० kphवेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणाऱ्या मंयकनं पहिल्या दोन षटकात आपली छापही सोडली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 8:20 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात २ नव्या चेहऱ्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. आयपीएलमध्ये आपली प्रतिभा दाखवून देणारा  मयंक यादव (Mayank Yadav) आणि नितीश रेड्डी (Nitish Reddy) यांनी बांगलादेश विरुद्धच्या टी-२- सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मयंक हा एक जलदगती गोलंदाज असून नितीश रेड्डी अष्टपैलू खेळाडू आहे. १५० kphवेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणाऱ्या मंयकनं पहिल्या दोन षटकात आपली छापही सोडली. 

मेडन ओव्हनं केली आपल्या टी-२० कारकिर्दीची सुरुवात 

दिल्ली येथे जन्मलेला मंयक यादव हा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. या हंगामात १५० kph पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत या युवा खेळाडूनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघारही घ्यावी लागली होती. पण आता त्याने थेट टीम इंडियातील एकदम दाबात एन्ट्री केली आहे. सूर्यकुमार यादवनं अगदी पॉवर प्लेमध्येच फास्टर गोलंदाजाच्या हाती चेंडू सोपवला. बांगलादेशच्या डावातील सहाव्या षटकात तो गोलंदाजीला आलं. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे पहिलं षटक त्याने निर्धाव टाकले. 

  मेडन ओव्हरसह पदार्पण करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा तो तिसरा गोलंदाज ठरलाय. अजित आगरकर हा भारताचा पहिला गोलंदाज आहे ज्याने टी-२० पदार्पणातील सामन्यातील पहिलं षटक निर्धाव टाकले होते. २००६ च्या जोहन्सबर्गच्या मैदानात आगरकरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून टी-२० मध्ये पदार्पण केले होते. २०२२ मध्ये  अर्शदीप सिंग याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले. साउदम्टनच्या मैदानात या गोलंदाजानेही निर्धाव षटक टाकले होते. या क्लबमध्ये आता मयंक यादवचाही समावेश झाला आहे. ग्वाल्हेरच्या मैदानात त्याने पदार्पणातील सामना खेळताना निर्धाव षटक टाकून आंतराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली. 

अचूक टप्प्यावर वेगवान मारा ठरतोय चर्चेचा विषय

पदार्पणाच्या सामन्यात विकेट मिळवण्यासाठी त्याने फार वेळ घेतला नाही. आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात महमदुल्लाहच्या रुपात त्याला विकेट मिळाली. पहिली विकेट कोणत्याही गोलंदाजासाठी एकदम खास असते. त्याच्या या विकेट्समध्ये वॉशिंग्टननं वाटा होता. ज्याने बांगलादेशी फलंदाजाचा सुंदर झेल टिपला. अचूक टप्प्याशिवाय पहिल्या सामन्यात तो कमालीच्या वेगासह गोलंदाजी करताना दिसला. हा देखील एक चर्चेचा विषय आहे.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश